ETV Bharat / state

धुळे : सामूहिक बलात्कार प्रकरणातील ३ आरोपींना अटक - women

पीडित महिलेने वर्णन केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता, टेकवाडे शिवारातील विविध गावांमध्ये जाऊन तपास केला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेताना पोलिसांनी टेकवाडे शिवारातील भरवाडे गावातील राजेश बदू भिल याला ताब्यात घेतले.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील ३ आरोपींना अटक
author img

By

Published : Jun 19, 2019, 4:37 PM IST

धुळे - शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात राखणदारीचे काम करणाऱ्या विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ३ नराधमांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील १ आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बलात्काराची घटना १५ जूनला घडली होती.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील ३ आरोपींना अटक

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात अशोक जैन यांच्या मालकीच्या शेतात राखणदारीचे काम करणारी विधवा महिला १५ जूनच्या मध्यरात्री बाहेर झोपली होती. दरम्यान, रात्रीच्यावेळी ४ अनोळखी इसमांनी जबरदस्तीने तिला उचलून शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिलेने वर्णन केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता, टेकवाडे शिवारातील विविध गावांमध्ये जाऊन तपास केला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेताना पोलिसांनी टेकवाडे शिवारातील भरवाडे गावातील राजेश बदू भिल याला ताब्यात घेतले. राजेश याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्यासोबतच्या गोरख भाईदास भिल, शरद गंगाराम भिल, (सर्व रा. भारवाडे, ता शिरपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील रवींद्र उर्फ बांगा रामचंद्र भिल हा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात राखणदारीच काम करणाऱ्या विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ३ नराधमांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणातील १ आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. टेकवाडे शिवारात हि घटना १५ जून रोजी घडली होती. Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात अशोक जैन यांच्या मालकीच्या शेतात राखणदारीच काम करणाऱ्या एका विधवा महिलेला १५ जूनच्या मध्यरात्री बाहेर झोपलेली असताना ४ अनोळखी इसमांनी जबरदस्तीने उचलून शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेने वर्णन केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता टेकवाडे शिवारातील विविध गावांमध्ये जाऊन तपास केला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतांना पोलिसांनी टेकवाडे शिवारातील भरवाडे गावातील राजेश बदू भिल याला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्यासोबतच्या गोरख भाईदास भिल, शरद गंगाराम भिल, सर्व रा भारवाडे, ता शिरपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील रवींद्र उर्फ बांगा रामचंद्र भिल हा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.