धुळे - मालेगाव येथील कोरोनाबाधित तरुणीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. .
मालेगाव येथील एका 22 वर्षीय तरुणीला कोरोना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने तिला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, मात्र या तरुणीची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला आयसोल्युशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होते. या तरुणीची प्रकृती शनिवारी अधिक गंभीर झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे धुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती यानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या तरुणीला कोरोना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.