ETV Bharat / state

धुळ्यात अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा जागर; १० वे साहित्य सम्मेलन आजपासून

अण्णा भाऊ साठे यांचे १० वे साहित्य सम्मेलन पारोळा रोडवरील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदीरात पार पडणार आहे. युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांच्या उपस्थितीत संमेलनाचे सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे.

कॉ. अण्णा भाऊ साठे
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:59 AM IST

धुळे - कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे १० वे साहित्य सम्मेलन आज पारोळा रस्त्यावरील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात पार पडणार आहे. यावेळी युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांच्या उपस्थितीत संमेलनाचे सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे.

कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य सम्मेलन महाराष्ट्रभर विविध ठिकाणी भरविली गेली. त्याच साखळीतील शेवटचे आणि १० वे साहित्य सम्मेलन खान्देशातील धुळे शहरात आयोजित करण्यात येत आहे. या संमेलनातील कार्यक्रमांची सुरुवात आज (शनिवार) दि. १३ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता प्रबोधन फेरीने होणार आहे.

त्यानंतर सकाळी दहा वाजता विचारवंत प्रा. गोपाळ गुरू यांच्या हस्ते सम्मेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कामगार नेते कॉ. डॉ. भालचंद्र कांगो भूमिकेची मांडणी करतील. पुरोगामी विचारवंत प्रा. विलास वाघ या सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष तर डॉ.सुखदेव थोरात सम्मेलनाध्यक्ष राहतील. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. बी. अडसूळे करतील. यावेळी तीन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

आज पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात दुपारी बारा वाजता-

चक्रव्यूहात अडकलेली लोकशाही या विषयावर वक्ता महेश झगडे (निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र) यांचे व्याख्यान दुसऱ्या सत्रात दुपारी एक वाजता होणार असून अण्णा भाऊंचा वर्ग संघर्ष या विषयावर वक्ता डॉ. मिलिंद आव्हाड, ऍड. राहुल वाघ आपले विचार मांडतील. तिसरे सत्र दुपारी तीन वाजता, डॉ. शशी रौय (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जागतिकीकरण आणि अण्णाभाऊंचे विचार या विषयावर वक्ता अनवर राजन (पुणे) आपले विचार मांडणार आहे. यावेळी राहुल कोसंबी (औरंगाबाद) हे उपस्थित राहतील. सायंकाळी साडेसहा वाजता शाहिरी जलसा व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी होणारे कार्यक्रम पुढील प्रमाने आहे -

१४ जुलै सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांचे वैचारीक नाते संबंध या विषयावर वक्ता देवेंद्र इंगळे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. त्यानंतर गोविंद पानसरे-व्यक्ती आणि विचार या विषयावर स्मिता पानसरे आपले विचार मांडतील तर अहमदनगर परिसंवाद-३ यात विचारवंत डॉ. अलिम वकील यांच्या अध्यक्षतेखाली, मूलतत्त्ववाद्यांची धर्म निरपेक्षता या विषयावर मिलिंद कसबे, अविनाश पाटील, राकेश वानखेडे आपले विचार मांडतील, तर दुपारी दोन वाजता संमेलनाचा समारोप विलास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ता, विचारवंत उत्तम कांबळे असणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात भूषविणार आहेत. संमेलनाचे उदघाटन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या जागतिक किर्तीच्या साप्ताहिकाचे संपादक प्रा. गोपाळ गुरू यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. विलास वाघ हे असणार आहेत तर संमेलनाचा समारोप प्रसिद्ध लेखक विचारवंत उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होणार आहे.

Intro:धुळे शहरात कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा शनिवारपासून जागर सुरू होणार आहे. धुळ्यातील पारोळा रोडवरील राजर्षी शाहू महाराज नाटय मंदिरात युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे सकाळी दहा वाजता उदघाटन होणार आहे.

Body:कॉ.अण्णांभाऊ साठे साहित्य संमेलन महाराष्ट्रभर विविध ठिकाणी भरविली गेलीत त्याच साखळीतील शेवटचे व 10वे कॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन खान्देशातील धुळे शहरात आयोजित कऱण्यात येत आहे. या संमेलनातील कार्यक्रमाची सुरुवात आज म्हणजेच शनिवार दि.13जुलै रोजी सकाळी 8:30वाजता प्रबोधन फेरीने होणार आहे.
त्यानंतर सकाळी 10:00वाजता विचारवंत प्रा. गोपाळ गुरू यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी कामगार नेते कॉ.डॉ.भालचंद्र कांनगो भूमिकेची मांडणी करतील. स्वागताध्यक्ष पुरोगामी विचारवंत प्रा.विलास वाघ तर संमेलनाध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात राहतील. उदघाटन सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जे.बी.अडसूळे करतील. यावेळी तीन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात दुपारी बारा वाजता-विषय:चक्रव्यूहात अडकलेली लोकशाही वक्ते-महेश झगडे(निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र)
सत्र दुसरे दुपारी एक वाजता होणार असून -विषय:अण्णा भाऊंचा वर्ग संघर्ष,वक्ते-डॉ. मिलिंद आव्हाड, ऍड. राहुल वाघ आपले विचार मांडतील. तिस-या सत्र दुपारी तीन वाजता, डॉ. शशी रौय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विषय-जागतिकीकरण आणि अण्णांभाऊंचे विचार, वक्ते-अनवर राजन,पुणे राहुल कोसम्बी, औरंगाबाद हे उपस्थित राहतील. सायंकाळी साडेसहा वाजता शाहिरी जलसा व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दुस-या दिवशी होणारे कार्यक्रम असे,
दुसरा दिवस-14जुलै सकाळी 10:00वाजता विशेष व्याख्यान-विषय-डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांचे वैचारीक नाते संबंध-वक्ते देवेंद्र इंगळे,विषय-गोविंद पानसरे व्यक्ती आणि विचार-वक्ते-स्मिता पानसरे, अहमदनगर परिसंवाद-3 विचारवंत डॉ.अलिम वकील यांच्या अध्यक्षतेखाली
विषय-मूलतत्त्ववादयांच्या धर्म निरपेक्षता,वक्ते-मिलिंद कसबे, अविनाश पाटील, राकेश वानखेडे तर दुपारी दोन वाजता संमेलनाचा समारोप विलास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी प्रमुख वक्ते विचारवंत उत्तम कांबळे हे असणार आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग,नवी दिल्ली चे माजी अध्यक्ष प्रा.सुखदेव थोरात भूषवित आहेत, संमेलनाचे उदघाटन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या जागतिक कीर्तीच्या साप्ताहिकाचे संपादक प्रा. गोपाळ गुरू यांच्या हस्ते होत असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.विलास वाघ हे असणार आहेत तर संमेलनाचा समारोप प्रसिद्ध लेखक विचारवंत उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.