चंद्रपूर - शहरातील स्नेहनगर परिसरात २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित नागरिकांची संख्या ५७ झाली आहे. हा युवक १३ जून रोजी मुंबईवरून परत आला होता. त्याला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली.
२१ जून रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आले होते. २२ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये केवळ १५ कोरोनाबाधित उरले आहेत.
आतापर्यंत आढळलेले कोरोनारुग्ण -
चंद्रपूरमध्ये आतापर्यंत २ मे (एक बाधित), १३ मे (एक बाधित), २० मे (एकूण १० बाधित), २३ मे (एकूण ७ बाधित), २४ मे (२ बाधित), २५ मे (एक बाधित), ३१ मे (एक बाधित), २ जून (एक बाधित), ४ जून (दोन कोरोनाबाधित), ५ जून (एक बाधित), ६ जून (एक कोरोनाबाधित) ७ जून (११ कोरोनाबाधित) ९ जून (३ कोरोनाबाधित), १० जून (एक बाधित) १३ जून (एक बाधित), १४ जून (३ बाधित), १५ जून (एक बाधित), १६ जून (५ बाधित), १७ जून (एक बाधित), १८ जून (एक बाधित), २१ जून (एक बाधित) आणि २२ जून (एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यात ५७ कोरोनाबाधित झाले आहेत. आतापर्यंत ४३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.