चंद्रपूर - कोरोनाचा धोका शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही बसला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अशा 17 हजार कैद्यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील 10 हजार कैद्यांची सुटका झाली, असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख आज (शनिवारी) जिल्ह्याचा कोरोनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी 17 हजार कैद्यांना सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात 60 कारागृह आहेत. त्यात जवळपास 38 हजार कैदी आहेत. यापैकी ज्या कैद्यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत, तसेच सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा पूर्ण करणाऱ्या कैद्यांना आपत्कालीन रजेवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.