ETV Bharat / state

चंद्रपुरातील ट्रॅफिक सिग्नल राहणार तीन तास बंद; उष्णतेच्या त्रासामुळे घेतला निर्णय

नागरिक वाढत्या उष्णतेमूळ त्रस्त झाले आहेत. मात्र या उन्हाच्या तडाख्यापासून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील चौकांमधील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेन्यात आला. विशेषतः सिग्नलवर थांबल्यावर याचा अधिक त्रास होतो. हाच त्रास वाचण्यासाठी आता चंद्रपूर शहरात दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद असणार आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी माहिती दिली.

author img

By

Published : May 26, 2022, 3:34 PM IST

traffic signal will closed afternoon due to heat wave in chandrapur
चंद्रपुरातील ट्रॅफिक सिग्नल राहणार तीन तास बंद

चंद्रपूर - चंद्रपुरातील तापमानाने मागील 122 वर्षांचा उच्चांक मोडीत काढला आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. अशावेळी बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना भर उन्हात उभे राहून ट्रॅफिक सिग्नलची वाट बघावी लागते. यापासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी दुपारी तीन तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद - उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होत आहे. प्रामुख्याने चंद्रपुरात मागील काही दिवसांमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात मागील काही दिवसातील सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. यामुळे नागरिक वाढत्या उष्णतेमूळ त्रस्त झाले आहेत. मात्र या उन्हाच्या तडाख्यापासून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील चौकांमधील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेन्यात आला. विशेषतः सिग्नलवर थांबल्यावर याचा अधिक त्रास होतो. हाच त्रास वाचण्यासाठी आता चंद्रपूर शहरात दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद असणार आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी माहिती दिली. आणखी काही दिवस हे उच्चांकी तापमान राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता शहरात दुचाकीस्वारांना प्रवास करताना व वाहतूक पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.