चंद्रपूर :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1311 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्याच बरोबर 17 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 39 हजार 318 झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
मंगळवारी मृत झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, तुकूम येथील 60 वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, दादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष
राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तसेच भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील 27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
मंगळवारी बाधित आलेल्या 1311 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 116 बल्लारपूर 44, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 75, नागभिड 80, सिंदेवाही 72, मूल 46, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 23, राजूरा 40, चिमूर 35, वरोरा 68, कोरपना 122, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनापासून काळजी घ्या-
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.