ETV Bharat / state

VIDEO : पर्यटकांनी वाघाची अडवली वाट, वाघोबा झाले नाराज अन्...

चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. याठिकाणी अनेक पर्यटकांना वाघोबा दर्शनही देतात. ९ फेब्रुवारीलाही दोन जिप्सीतील पर्यटकांना वाघोबाने दर्शन दिले.

tadoba tiger reserve chandrapur
पर्यटकांनी वाघाची अडवली वाट
author img

By

Published : Feb 12, 2020, 11:55 AM IST

Updated : Feb 12, 2020, 12:43 PM IST

चंद्रपूर - पर्यटकांच्या जिप्सीने वाघाची वाट अडवल्याने वाघोबा चांगलेच नाराज झाले. इतकच नाहीतर चिडलेल्या वाघाने हल्ला करण्याचे संकेतही दिले. यामुळे पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ९ फेब्रुवारीला हा थरार पाहायला मिळाला.

पर्यटकांनी वाघाची अडवली वाट, वाघोबा झाले नाराज अन्...

मटकासुर, असे या वाघाचे नाव आहे. ९ फेब्रुवारीला पर्यटक जंगल सफारीसाठी गेले होते. त्यावेळी दोन जिप्सींनी वाघोबाची वाट अडवली. वाघोबाला जायला रस्ता नसल्याने ते चांगलेच बिथरले. पण, वाघाने जिप्सीवर हल्ला केला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच ही घटना ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील तलावाजळवचा असल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक एन. प्रवीण यांनी सांगितले.

Last Updated : Feb 12, 2020, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.