ETV Bharat / state

चंद्रपुरात वाघाची दहशत; 50 वर्षांपासूनच्या यात्रेत पडला खंड - जोगापूर चंद्रपूर यात्रा लेटेस्ट न्यूज

राजुरा तालुक्यातील जोगापूर परिसरात वाघांचे वास्तव्य अधिक संख्येत दिसत असल्याने पुढील संघर्ष व समस्या टाळण्यासाठी वनविभागाने ही पावले उचलली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. या परिसरातील वाघांवर नजर ठेवली जात आहे. त्यांच्या रोजच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी यंदा जोगापूर देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच एकट्या- दुकट्याने या भागात फिरू नये, असा इशारादेखील वनविभागाने दिला आहे.

tiger fears in jogapur chandrpur; stay on 5o years old yatra
चंद्रपूरात वाघाची दहशत; थांबविली 50 वर्षांपासूनची यात्रा
author img

By

Published : Dec 14, 2019, 3:04 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिकांना एका वाघाच्या दहशतीचा प्रत्यय आला आहे. वाघाच्या दहशतीने चक्क यात्राच स्थगित करावी लागल्याची स्थिती जिल्ह्यातील राजुरा शहराजवळ असलेल्या जोगापूर इथे निर्माण झाली. यामुळे जोगापूर येथील प्रसिद्ध मारुती देवस्थानात गेली ५० वर्षे नियमित सुरू असलेल्या यात्रेवर वाघाच्या दहशतीचे सावट आले. तसेच भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. वनविभागाने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी यात्रा स्थगित केली आहे. तर चारचाकीने देवदर्शनास मात्र मुभा देण्यात आली आहे.

चंद्रपूरात वाघाची दहशत; थांबविली 50 वर्षांपासूनची यात्रा

जिल्ह्यातील राजुरा भागातील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या टेकड्यांवर पट्टेदार वाघांचे वास्तव्य असते. राजुरा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगापूर येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात मार्गशीर्ष महिनाभर मोठी यात्रा भरते. यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यात्रेनिमित्त या भागात स्थायी दुकाने आणि हजारो नागरिकांचा वावर असतो. मात्र, यंदा जोगापूर मंदिर परिसरात वाघांचे सहज दर्शन होत असल्याने आणि हा आकडा चारवर पोहोचल्याने वनविभागाने इतिहासात पहिल्यांदाच जोगापूरची यात्रा स्थगित केली आहे.

हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : गुवाहटीत संचारबंदी शिथील, इंटरनेट सेवा बंदच

यामुळे परिसरात शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर मात्र, चारचाकी वाहनाने देवदर्शनास मुभा देण्यात आली आहे. या भागात सध्या वनविभागाने तात्पुरता नाका निर्माण करत वाहनांचे आवागमन रोखले आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे.

राजुरा तालुक्यातील जोगापूर परिसरात वाघांचे वास्तव्य अधिक संख्येत दिसत असल्याने पुढील संघर्ष व समस्या टाळण्यासाठी वनविभागाने ही पावले उचलली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. या परिसरातील वाघांवर नजर ठेवली जात आहे. त्यांच्या रोजच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी यंदा जोगापूर देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच एकट्या- दुकट्याने या भागात फिरू नये, असा इशारादेखील वनविभागाने दिला आहे.

हेही वाचा - पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; घराच्या भितींना तडे

एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरावर वाघाचे वास्तव्य असताना ताडोबा व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आणखी शंभर वाघांची वस्ती आहे. उत्तम नैसर्गिक अधिवास असल्याने या संख्येत वाढ होत असली तरी ही वाढती संख्या वन विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लाखोंची गर्दी असलेला यात्रेचा एखादा परिसर म्हणजे नवे संवेदनशील ठिकाण ठरत आहे. आणखी किती काळ हा भाग दहशतीत राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, सध्या मंदिर परिसरात भयाण शांतता बघायला मिळत आहे. ही शांतता आणखी किती दिवस राहणार, हा प्रश्न भाविक करीत आहेत.

Intro:वाघाने थांबविली जोगापूरची यात्रा;मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी घेतला निर्णय;भक्तात नाराजीचा सूर

चंद्रपूर

एखाद्या वाघाची दहशत किती असावी, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे. वाघाच्या दहशतीने चक्क यात्राच स्थगित करावी लागल्याची स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहराजवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती देवस्थान जोगापूर इथं निर्माण झाली. गेली ५० वर्षे नियमित सुरु असलेल्या यात्रेवर वाघाच्या दहशतीचे सावट आले आणि भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. वनविभागाने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी यात्रा स्थगित केली असून, चारचाकीने देवदर्शनास मात्र मुभा देण्यात आली आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभाग म्हणजे तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेला भाग. या भागातील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या टेकड्या म्हणजे पट्टेदार वाघांचे वास्तव्य असलेले क्षेत्र. राजुरा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगापूर येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात मार्गशीर्ष महिनाभर मोठी यात्रा भरते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यात्रेनिमित्त या भागात स्थायी दुकाने व हजारो नागरिकांचा वावर असतो. मात्र यंदा जोगापुर मंदिर परिसरात वाघांचे सहज दर्शन होत असल्याने व हा आकडा चारवर पोचल्याने वनविभागाने इतिहासात पहिल्यांदाच जोगापूरची यात्रा स्थगित केली आहे. परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो. मात्र, देवदर्शनास मुभा देण्यात आली असून, केवळ चारचाकी वाहनाने जाण्यास ही मुभा आहे. मंदिर मार्गावर जाणाऱ्या अनेक भक्तांना अशाप्रकारे वाघाचे दर्शन होत आहे. या भागात सध्या वनविभागाने तात्पुरता नाका निर्माण करत वाहनांचे आवागमन रोखले आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झालाय.
राजुरा तालुक्यातील जोगापूर परिसरात वाघांचे वास्तव्य अधिक संख्येत दिसत असल्याने पुढील संघर्ष व समस्या टाळण्यासाठी वनविभागाने ही पावले उचलली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. या परिसरातील वाघांवर नजर ठेवली जात असून, त्यांच्या रोजच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी यंदा जोगापूर देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. एकट्या- दुकट्याने या भागात फिरू नये, असा इशारादेखील वनविभागाने दिला आहे.

एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरावर वाघाचे वास्तव्य असताना ताडोबा व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आणखी शंभर वाघांची वस्ती आहे. उत्तम नैसर्गिक अधिवास असल्याने या संख्येत वाढ होत असली तरी ही वाढती संख्या वन विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लाखोंची गर्दी असलेला यात्रेचा एखादा परिसर म्हणजे नवे संवेदनशील ठिकाण ठरत आहे. आणखी किती काळ हा भाग दहशतीत राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या मंदिर परिसरात भयाण शांतता बघायला मिळत आहे. ही शांतता आणखी किती दिवस राहणार, हा प्रश्न भाविक करीत आहेत.Body:विडीओ बाईट
विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्राधिकारी राजूरा

भाविकConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.