ETV Bharat / state

चंद्रपूर : वनक्षेत्रातील खोदतळ्यांना कुंपण; वनविभागाचे अजब धोरण - चंद्रपूर वन विभाग अजब निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. येथील वनात विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा वावर आहे. वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च करून वनक्षेत्रात खोदतळ्यांची निर्मिती केली. आता याच खोदतळ्यांभोवती कुंपण उभे करण्याचा घाट वनविभागाने घातला आहे.

वनक्षेत्रातील खोदतळ्यांना कुंपण
author img

By

Published : Nov 17, 2019, 11:15 AM IST

चंद्रपूर - वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च करून वनक्षेत्रात खोदतळ्यांची निर्मिती केली. आता याच खोदतळ्यांभोवती कुंपण उभे करण्याचा घाट वनविभागाने घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात हा प्रकार घडला.

वनक्षेत्रातील खोदतळ्यांना कुंपण

चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. येथील वनात विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा वावर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा शोधात वन्यजीव लोकवस्तीत येत. यामुळे कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या होत्या. यावर उपाययोजना म्हणून लाखो रुपये खर्चून वनविभागाने खोदतळ्यांची निर्मिती केली.

हेही वाचा - सरन्यायाधीश रंजन गोगोई आज होणार निवृत्त, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर

आता मात्र, या खोदतळ्यांच्याभोवती कुंपण घालण्याचे अजब धोरण वनविभागाने आखले आहे. पोडसा वनक्षेत्रात रोपवनासाठी कुंपण उभे केले जात आहे. या कुंपणाच्या आत एक खोदतळ्याचाही अंतर्भाव होत आहे. तळ्याचा भोवती कुंपण उभे राहिल्यास वन्यप्राण्यांना पाणी पिण्यास अडथळा निर्माण होईल. वनविभागाच्या या अजब धोरणावर प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Intro:वनक्षेत्रातील खोदतळे कुंपणानी वेढले;वनविभागाचे धोरण वन्यजीवांचा जिवावर उठले

चंद्रपूर

वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्चून वनक्षेत्रात खोदतळ्याची निर्मिती केली. खोदतळ्यातील पाण्याने वन्यजीव तृष्णा भागवित होते. आता चक्क खोदतळ्याचा सभोवताल वनविभाग कुंपण उभे करित आहेत.वन्यजिवांचा स्वरक्षणाची जवाबदारी असलेल्या वनविभागाचे अजब धोरण वन्यजिवांचा जिवावर उठले आहे. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात घडला आहे.

चंद्रपूर जिल्हा वनाने वेढला आहे. येथिल वनक्षेत्रात विविध प्रजातींचा वन्यजीवांचा मोठा आवास आहे. सोबतच जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षही टोकाला गेलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा शोधात वन्यजीव गाववेशीवर येवून धडकतात. यातून तृष्णभक्षक प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार वाढले होते तर कठळे नसलेल्या विहीरीत पडून वाघ,बिबट यांच्या दूदैवी मृत्यू झाल्याचा अनेक दूदैवी घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
वन्यजीवांना तृष्णा भागविण्यासाठी वनक्षेत्रातच वनविभागाने उपाययोजना केल्या. लाखो रुपये खर्चून वनक्षेत्रात अनेक ठिकाणी खोदतळे खोदण्यात आले. या खोदतळ्यात साचलेल्या पाण्याने वन्यजीव तृष्णा भागवित असत.
आता चक्क खोदतळ्याचा सभोवताल कुंपण करण्याचे अजब धोरण वनविभागाने आखले आहे.गोंडपिपरी तालूक्यातील नविन पोडसा वनक्षेत्रात रोपवनासाठी कुंपण उभे केले जात आहे. या कुंपणाचा आत खोदतळे आले आहेत. खोदतळ्याचा भोवताल कुंपण उभे होत असल्याने वन्यजिवांना तृष्णा भागविण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे या वनक्षेत्रातील नाल्यातील पाणी उन्हाळ्याच्या सूरवातीलाच आटत असते. शिकारीचे प्रमाणही या भागात मोठे आहे.दरम्यान वनविभागाचा धोरणावर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.