ETV Bharat / state

Chandrapur Court : न्यायालयात थुंकणाऱ्यांवर मोठी कारवाई ; न्यायालयाने सुनावली दोन तासांची कोठडी - चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालय

चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय ( Chandrapur District and Sessions Court )परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारण्यात ( Corporations team imposed a fine )आला आहे. एवढेच नव्हे तर मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे.

Chandrapur District and Sessions Court
चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय
author img

By

Published : Dec 23, 2021, 5:10 PM IST

चंद्रपूर: सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असून देखील बरेचजण खुलेआम थुंकतात. आता अशा खुलेआम थुंकणारांवर न्यायालयाच्या ( Court action against those who spit openly ) आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई ( Action through Corporation ) केली जात आहे. याचाच प्रत्यय म्हणजे चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचबरोबर मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा ( Sentenced to two hours in custody) सुनावली. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि त्यांना मास्क वापरण्याची सवय लावण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेकककडून कठोर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा - मृत श्वानाच्या न्यायासाठी 9 वर्षांचा संघर्ष; मग न्यायालयाने दिला हा निर्णय

सध्या कोरोना महामारीचे मोठे संकट आहे. त्यामुळे अशा काळात जर नागरिक लापर्वाही बाळगून रस्त्यावर थुंकत असतील, तर त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास मदत होईल. या अगोदरच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारन आणि आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. मास्कमुळे विषाणूचा फैलाव नियंत्रणात करता येईल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिका कारवाईचा बडगा उगारत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई -

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कायदेशीर तरतुदीनुसार केवळ २०० रुपयांऐवजी आता १२०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कारण याबाबत दंडाच्या सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ रोजी दिल्या होत्या. त्यचबरोबर मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल केला जाणार आहे. तसेच महापालिका प्रशासनाने लोकांना आवाहन केले आहे की, कोेरोनाच्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करा आणि तसेच आपल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची देखील काळजी घ्या.

हेही वाचा - Nagar Panchayat Election 2021 : ८४ जागांवर ४२३ उमेदवार नशीब अजमावणार; सहा नगरपंचायतींची निवडणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.