ETV Bharat / state

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा; खरीप हंगामातही पिककर्जासाठी बँकेकडे हेलपाटे - पीककर्ज

जिवती भागातील पाटण येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथे दररोज शेतकरी पिककर्जासाठी रांगा लावत आहेत. मात्र, अजूनही त्यांना पिककर्जाचे वाटप करण्यात आलेले नाही. आज या, उद्या या, असे म्हणत या शेतकऱ्यांना टाळण्यात येत आहे. खरीप हंगामाचा काळ असल्याने या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप लवकर करणे गरजेचे आहे.

crop loans to farmers
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा
author img

By

Published : Jun 13, 2020, 7:09 PM IST

चंद्रपूर- ऐन खरीप हंगामाच्या काळात पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यासाठी ते सकाळपासून बँकेमध्ये रांगा लावत आहेत. मात्र, बँकेचे अधिकारी कर्मचारी त्यांना कुठलेही कारण सांगून परतवून लावत आहेत. यामुळे शेती करायची तरी कशी? हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. कुठल्याही शेतकऱ्यांची पिककर्जासाठी अडवणूक करू नका, असे त्यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात आले. याचे अधिकृत दस्तऐवज देखील या शेतकऱ्यांकडे आहेत. असे असतानाही बँक त्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत. आज या, उद्या या, असे म्हणत त्यांना टाळण्यात येत आहे. त्यामुळे बँकेत दररोज शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. जिवती हा दुर्गम भाग आहे. या भागातील पाटण येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथे दररोज शेतकरी पिककर्जासाठी रांगा लावत आहेत. मात्र, अजूनही त्यांना पिककर्जाचे वाटप करण्यात आलेले नाही. तुमची यादी आधी तहसील कार्यालयात जाईल. त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल, असे सांगण्यात येते. मात्र, खरीप हंगामाचा काळ आता सुरू झाला आहे. यावेळी बियाण्यांची पेरणी करणे गरजेचे आहे. एकदा पावसाळा सुरू झाला, तर हे शक्य होणार नाही. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्जाचे वाटप करणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.