चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या भंगारपेठ येथील तळीराम मुख्याध्यापकाने दारू ढोसून बांधावरच दिवस काढला होता. माध्यमांतून हा प्रकार समोर आला. या गंभीर प्रकाराची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी घेतली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागविला. त्यानंतर तळीराम मुख्याध्यापक अनिल नानाजी बोरकुटे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक अनिल बोरकुटे याने प्रमाणाबाहेर मद्यसेवन केले. यानंतर शाळेच्या वेळेत शाळेलगत असलेल्या बांधावर झोपून राहिले. हा प्रकार माध्यमातून पुढे आला.
शिक्षण विभागावर सर्वस्तरातून बोचरी टिका होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी तात्काळ या प्रकरणाचा अहवाल मागितला. त्यानंतर गुरुवारी तळीराम शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.