चंद्रपूर - कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापनाने हा प्रकल्प पर्यटकांसाठी बंद (Tadoba Tiger Reserve closed for tourists) करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (11 जानेवारी) हा प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असणार आहे. यापूर्वी ज्यांनी बुकिंग केले आहे अशा पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे परत मिळणार आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. या प्रकल्पाच्या परिसरात शंभराहून अधिक वाघ आहेत. त्यामुळे ताडोबा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शन असे समीकरण आता झाले आहे. वाघांना बघण्यासाठी जगभरातून पर्यटक आवर्जून येथे येतात. नुकताच येथे रितेश देशमुख आपली पत्नी जेनेलिया डिसुझा आणि मुलांना घेऊन येथे आला होता. ताडोबा व्याघ्रप्रकल्प नेहमीच पर्यटकांच्या बुकिंगने हाऊसफुल्ल असतो. मात्र, आता सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला. राज्यात सर्वाधिक रुग्ण येथे आढळून येत आहेत. कोरोनाचा धोका हा वन्यजीवांना देखील असतो. हा धोका लक्षात घेता ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी बंद (Tadoba Tiger Reserve closed for tourists ) करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार 11 जानेवारीपासून पर्यटन पूर्णपणे बंद असणार आहे. ज्या पर्यटकांनी आधी बुकिंग करुन ठेवले आहे, अशा पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने हे पैसे परत केले जाणार आहेत. याबाबतची माहिती ताडोबा व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.
ताडोबा व्याघ्रप्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्णय - कोरोनामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद
कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापनाने हा प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्याचा (Tadoba Tiger Reserve closed for tourists ) निर्णय घेतला आहे. उद्यापासून (11 जानेवारी) हा प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असणार आहे.