चंद्रपूर - शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी पाठीत खंजीर खुपसला असे विधान उद्धव ठाकरे वारंवार करीत आहेत. त्यांनी नुकतीच एका दैनिकाला मुलाख दिली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे वारंवार त्यांनी या शब्दांची पुनरावृत्ती केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना अजूनही आपली चूक लक्षात आलेली दिसत नाही. ( Sudhir Mungantiwar criticizes Uddhav Thackeray ) देव करो आणि आपल्याला 'खंजीर'च चिन्ह मिळे या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
अशा शब्दांचा उल्लेख महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये होत नाही - मुलाखतीवर मुनगंटीवार यांनी प्रखर टीका केली आहे. ही मुलाखत एक वैफल्यग्रस्त माजी मुख्यमंत्र्यांचा जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठीचा अपयशी प्रयत्न होता. या शब्दांत मुनगंटीवार यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे. ही एक कौटुंबिक मुलाखत होती, त्यामुळे ती सहज, सुलभ प्रश्न विचारत ही मुलाखत झाली. तसेच, ठाकरे यांनी या मुलाखतीत अशा शब्दांचा उल्लेख केला जो सहसा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये होत नाही असही ते म्हणाले आहेत.
मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले - आज ज्या आमदारांनी भगवा हाती घेतला त्यांच्यावर टीका करायची हा जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. मी रुग्णालयात असताना हे षड्यंत्र रचण्यात आले असे ठाकरे मुलाखतीत सांगतात. मात्र, हे सांगताना ज्या भाषेचा वापर त्यांनी केला. तो योग्य नव्हे. विधानसभेत कधी न ऐकलेली भाषा आपण वापरता. या राज्यात आपण काय भाषा वापरतो आहे? खरे तर यावर ही मुलाखत व्हायला हवी होती. वारंवार पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा उद्धव ठाकरे करीत आहेत. देव करो आणि पुढंचे बोधचिन्ह हे आपल्याला 'खंजीर'च मिळो असे बोलत मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
ईडीच्या दबावाचा काय संबंध?' - शिंदे गटातील नेते हे ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे भाजपासोबत गेले असा आरोप करण्यात येत आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. ईडीची नोटीस ही राज ठाकरे संजय राऊत, अनिल परब यांना देखील आली होती आणि असे असते तर हे सर्व नेते भाजपामध्ये आले असते. मात्र आपण पराक्रमी आहोत, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
'ठाकरेंचा मुंबई महापालिकेत पराभव केल्याशिवाय शब्दरचना बदलणार नाही' - उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेली मुलाखत म्हणचे जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे एकाच शब्दरचनेचा वारंवार शब्दप्रयोग करतात की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव आहे. मात्र हे पाप करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, मात्र ठाकरे आता त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव हा काँग्रेसचा होता, तेव्हा भाजपा नव्हता. महाराष्ट्रापासून मुंबई कोणीही तोडू शकत नाही. मात्र ठाकरे हे एकच केसेट वारंवार वाजवतात. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना पराभूत व्हावे लागले की त्यांची ही शब्दरचना जरूर बदलेले, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा - Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, बाळासाहेब ठाकरे....