ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar on SC Hearing : न्यायालयानं इतकी वर्षे अडकवून ठेवला राम मंदिराचा प्रश्न; मात्र...; काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

Sudhir Mungantiwar on SC Hearing : सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं होतं. यावर सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत, ती लवकरात लवकर निकाली काढली पाहिजेत, असं म्हटलंय.

Sudhir Mungantiwar on SC Hearing
Sudhir Mungantiwar on SC Hearing
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:08 AM IST

चंद्रपूर Sudhir Mungantiwar on SC Hearing : आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना न्यायालयानं चांगलंच फटकारलं आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिलीय. न्यायालयाचा तो अधिकार आहे, तसंच न्यायालयानं ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं पालन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील. मात्र, जेव्हा हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडं गेलं तेव्हा नार्वेकर हे देखील न्यायाधीशच होते, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी राहूल नार्वेकरांची पाठराखण केली आहे.

अनेक खटले प्रलंबित आहेत ते निकाली काढा : सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारताना काही गोष्टीचा विचार करावा. सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढायला पाहिजे. राम मंदिराचा प्रश्न देखील न्यायालयानं इतकी वर्षे अडकवून ठेवला, असंही सुधीर मुनगंटीवारांनी यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल नार्वेकर यांना फटकारल्याबाबत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर काहीशी नाराजी व्यक्त केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात परतले. यावेळी त्यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे भेटीवर काय म्हणाले मुनगंटीवार : टोल नाक्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावरही मुनगंटीवारांनी यांनी भाष्य केलंय. भेट घेण्यात काहीच गैर नाही, राजकारणात मतभिन्नता असली, तरी शत्रुत्व नसतं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला, ही बाब स्तुत्य आहे. राजकीय क्षेत्रात वावरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनानं काम करतात, असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Nana Patole On Mungantiwar: बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला उत्तर देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांना उत्तर देण्यास नानांचा नकार
  2. Tiger Cub Name Controversy : सत्ताधाऱ्यांना 'आदित्य' नावाचा तिरस्कार? वाघाच्या नावाची चिठ्ठी बदलली; संभाजीनगरात नेमक काय घडंल?
  3. Maharashtra Politics : नेहरु सिगारेट घेण्यासाठी विमान पाठवायचे हे चालतं का? मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.