ETV Bharat / state

Nagar Panchayat Election 2021 : कोरपना नगरपंचायत निवडणुकी दरम्यान भाजपाच्या वाहनावर दगडफेक - Stone pelting on BJP vehicle in Korpana Nagar Panchayat

कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी ( Korpana Stone Pelting ) राडा झाला. यात काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या प्रकरणात विजय बावणे आणि नितीन बावणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल ( Case Against Congress Leader In Korpana ) करण्यात आला.

Nagar Panchayat Election 2021
Nagar Panchayat Election 2021Nagar Panchayat Election 2021
author img

By

Published : Dec 21, 2021, 3:21 PM IST

चंद्रपूर - कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी ( Korpana Stone Pelting ) राडा झाला. यात काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या प्रकरणात विजय बावणे आणि नितीन बावणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल ( Case Against Congress Leader In Korpana ) करण्यात आला. त्यांना अटक केल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल; परिसरात तणावाचे वातावरण -

कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीत भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना मित्र पक्षाकडून शहर परिवर्तन आघाडी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी थेट लढत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले यांची कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री काँग्रेसचे नेते विजय बावणे, उमेदवार नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याविरोधात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी विरुद्ध कलम कलम १४३, १४७, ३२३, ३४१, ४४७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अखेर आज या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर आज दुपारी या दोन्ही आरोपींना जामीन मिळाला. मात्र, या प्रकरणामुळे कोरपना येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Nagar Panchayat Election 2021 : सकाळ-सकाळ मतदान केंद्रावर शुकशुकाट, मात्र ९५ वर्षाच्या आजी कडाक्याच्या थंडीत हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.