चंद्रपूर - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज चंद्रपूर जिल्ह्याच्या ( Balasaheb Thorat in Chandrapur ) दौऱ्यावर आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
आज सकाळी 11.30 वाजता वरोरा येथे आगमन व वरोराच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट.
दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव.
दुपारी 1:30 वाजता चांदा क्लब, वरोरा नाका, चंद्रपूर येथे आगमन व स्पोर्ट्स अकॅडमी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 1.45 वाजता खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या लोकमान्य विद्यालयासमोरील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित.
दुपारी 2 वाजता शकुंतला लॉन येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी 4 30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.