ETV Bharat / state

चंद्रपुरात मतदान जनजागृतीसाठी 'सेल्फी पॉईंट' - मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 'मी मतदान करणार' असा संदेश असलेले सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती करण्यासाठी बस स्थानक आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात हे सेल्फी पॉईंट तयार केले आहेत.

सेल्फी पॉईंट
author img

By

Published : Oct 20, 2019, 12:08 PM IST

चंद्रपूर - राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. लोकशाही बळकट करण्याकरता समाजातील प्रत्येक घटकाने मतदानात सहभाग घेणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती करण्यासाठी बस स्थानक आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. या सेल्फी पॉईंटला नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 'मी मतदान करणार' असा संदेश असलेले सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे हस्ते करण्यात आले. सेल्फी पॉईंटवर फोटो काढून व्हॉट्सअॅप गृपवर एकमेकांना मतदान करण्याकरता संदेश पाठवले जात आहेत. मतदारांना जागृत करण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

मतदान करण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास १९५० या क्रमांकावर मदत मिळेल. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 10000 संकल्पपत्र भरून घेण्यात आली आहेत. 21 ऑक्टोबरला सर्व मतदार बंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. भारतीय लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.

Intro:मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट
निवडणुक विभागाच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा ,चिमूर
महाराष्ट्र राज्य १३ व्या विधानसभे करीता सार्वत्रीक निवडणुकीसाठी २१ आक्टोबंरला मतदान होणार आहे . लोकशाही बळकट करण्याकरीता प्रत्येक समाज घटकाने मतदानात भाग घ्यावा या करीता निवडणुक विभागातर्फे जनजागृती करण्या करीता उपक्रम राबविल्या जात आहे .७४ चिमूर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती करण्याकरिता बस स्थानक आणी तहसील कार्यालय परीसरात सेल्फी पाँइट निर्माण केले आहेत . या सेल्फी पाँइटला नागरीकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकी मध्ये मतदानाचा टक्का वाढावा याकरीता ७४ चिमूर विधानसभा मतदान जन जागृती पथका द्वारे विविध उपक्रम राबविल्या जात आहे . जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे मि मतदान करणार असा संदेश असलेला सेल्फी पाँईट निर्माण करण्यात आले आहेत . या सेल्फी पाँईटचे उद्घाटन चिमूर विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे हस्ते करण्यात आले .सेल्फी पाँईटवर फोटो काढूण व्हॉटसप गृपवर एक मेकांना मतदान करण्या करीता संदेश पाठविल्या जात आहे . या अनोख्या मतदारांना जागृत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक होत असुन सेल्फी पाँईटला उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे .
मतदान करण्या करीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास १९५o या क्रंमाकावर डायल करण्या संबधी संदेश , मतदान तारीख व इतर बाबी असलेला मोठ्ठा गॅस फुगा तहसील कार्यालयावर लावण्यात आलेला आहे. . शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाकडून *10000 संकल्पपत्र* भरून घेण्यात आलेत. एकंदरीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार अशी अपेक्षा व्यक्त करून *21 ऑक्टोंबर 2019* *रोजी सर्व मतदार बंधू-भगिनीं उत्स्फूर्तपणे मतदान करावे ,भारतीय लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी 74- चिमूर विधानसभा प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.*
Body:स्विप कार्यक्रम सहाय्यक नोडल अधिकारी निखातेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.