चंद्रपूर - आरोग्य तपासणीसाठी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाने ( Drunken Ambulance Driver Hit Truck In Chandrapur ) ट्रकला धडक दिली. यात रुग्णवाहिकेतील २१ जण जखमी झाले. यात सहा गंभीर ( Ambulance Accident In Chandrapur ) जखमी, तर पंधरा जण किरकोळ जखमी झाले होते. गंभीर जखमी असलेल्या सहा रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मद्यपी चालकावर गुन्हा ( Police Registered FIR Against Ambulance Driver ) दाखल केला आहे.
रुग्णांना घेऊन निघाली होती रुग्णवाहिका ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार ( Congress Leader Vijay Wadettiwar ) यांचा सोमवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ( Rural Hospital Bramhapuri) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी मुडझा या परिसरातील अनेक रुग्ण आले होते. तपासणीसाठी सायंकाळ झाल्याने त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राची एमएच ३४ बीजी ९९६३ ही रुग्णवाहिका होती. याच रुग्णवाहिकेने शिबिरासाठी आलेले रुग्ण मुडझा येथे घेऊन जात होते.
मद्यधुंद चालकाने ट्रकला दिली धडक रुग्णवाहिकेतून रुग्णांना घेऊन जाणारा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने जाताना रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला ( Drunken Ambulance Driver Hit Truck In Chandrapur ) धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील २१ जण जखमी झाले. मिथुन लोखंडे, गोविंदा राहाटे, प्रभाकर वाळके, नारायण नागापुरे, अनिल मोहुर्ले, सुनील माकडे, चंद्रकांत मुसकुटे हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. किरकोळ जखमींमध्ये विनायक राऊत, रवींद्र निशाने, बापुजी दडमल, काशिनाथ रोहणकर, लालाजी दिवटे, तुकाराम हुड, डाकराम चट्टे, प्रवीण शेंडे, रावजी मेश्राम, कैलाश ऊईके, देविदास कोसरे, रविराज दडमल, दिलीप पेंदाम, विनायक राऊत यांचा समावेश आहे. यातील सहा जणांना सुटी देण्यात आली, तर उर्वरित नऊ जणांवर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ( Rural Hospital Bramhapuri) उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेचा चालक सुनील मारवाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.