ETV Bharat / state

धक्कादायक; दारू तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल, मुख्य आरोपी फरार - तस्कर हल्ल्यात पोलीस जखमी प्रकरण चंद्रपूर

पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना अमित गुप्ता नावाचा तस्कर आपल्या चारचाकी वाहनातून दारुतस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार लाकडे हे एक पोलीस कर्मचारी आणि सहायक कर्मचाऱ्याला घेऊन डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी तस्कर अमित गुप्ताने उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली.

Chandrapur
जखमी पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे
author img

By

Published : May 30, 2020, 1:45 PM IST

Updated : May 30, 2020, 3:04 PM IST

चंद्रपूर - दारू तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करुन आरोपीला पोलीस ठाण्यात नेताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. यात रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे. तर त्याचे दोन सहकारी आणि आईवडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला

रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना अमित गुप्ता नावाचा तस्कर आपल्या चारचाकी वाहनातून दारू तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार लाकडे हे एक पोलीस कर्मचारी आणि सहायक कर्मचाऱ्याला घेऊन डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी अमित गुप्ताला याची भनक लागली आणि त्याने हे वाहन आपल्या घराकडे पळविले. महाकाली चौक परिसरातील त्याच्या घरी पोलीस येऊन धडकले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशीदारूच्या चार पेट्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्यात घेऊन जाताना लाकडे आणि आरोपी अमित गुप्ता यांच्यात झटापट झाली.

यावेळी आरोपीचे आईवडील आणि दोन सहकारी देखील आले. त्यांनी लाकडे यांना मारहाण केली. यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे.

Last Updated : May 30, 2020, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.