ETV Bharat / state

मुंबईतून आलेला युवक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या एकूण 23

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून हा युवक 25 मे रोजी विमानाने नागपूरला आला होता. नागपूर, चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला त्याच दिवशी राजुरा येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते.

corona report
मुंबईतून आलेला युवक पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या एकूण 23
author img

By

Published : Jun 1, 2020, 9:50 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात राजुरा येथील एका २७ वर्षीय तरुणाचा वैद्यकीय तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे.

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून हा युवक २५ मे रोजी विमानाने नागपूरला आला होता. नागपूर, चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला २५ रोजी राजुरा येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्याला ३० तारखेला लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर ३० मे ला त्याचा स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रविवारी ३१ मे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ -

चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २३ झाले आहेत. आता पर्यत १२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २३ पैकी अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या ११ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.