ETV Bharat / state

आज तीन मृत्यूसह 353 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले; एकूण पॉझिटिव्ह रुग्ण झाले 2291 - चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूरमध्ये 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Apr 1, 2021, 9:31 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 390 झाली आहे. सध्या 2291 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 76 हजार 112 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 44 हजार 375 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये वार्ड नं. 16, मूल, येथील 67 वर्षीय पुरूष, रामनगर, चंद्रपूर येथील 38 वर्षीय पुरूष व महाडोली वरोरा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 389, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या 353 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 102, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 11, भद्रावती 37, ब्रह्मपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही सात, मूल 13, सावली सहा, गोंडपिपरी एक, राजुरा 10, चिमूर 36, वरोरा 74, कोरपना 21, जीवती तीन व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.