ETV Bharat / state

विशेष : आरोग्य यंत्रणेचे यश; जाणून घ्या कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू न झालेला 'चंद्रपूर पॅटर्न' - चंद्रपूर कोरोना पॅटर्न

सर्वत्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चंद्रपूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला आहे.

chandrapur corona
'चंद्रपूर पॅटर्न'
author img

By

Published : Jul 14, 2020, 11:57 PM IST

Updated : Jul 15, 2020, 6:15 AM IST

चंद्रपूर - राज्यात सर्वत्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चंद्रपूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला आहे. रुग्णांची संख्या दोनशेवर गेली असली तरी या जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. एवढेच काय तर एकाही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचीसुद्धा पाळी आली नाही. ही बाब यासाठी अहोरात्र राबणाऱ्या जिल्हा यंत्रणेचे निश्चितच मनोबल वाढवणारी आहे. योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी हे जिल्हा यंत्रणेच्या प्रयत्नांचे फलित आहे. चंद्रपूरचा हा पॅटर्न निश्चितच राज्याचा आदर्श प्रयोग ठरलेला आहे.

जाणून घ्या कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू न झालेला 'चंद्रपूर पॅटर्न'

हेही वाचा - सत्तेचा माज दाखवणाऱ्यांना 'आयपीएस' होऊन धडा शिकवणार; सूरतच्या 'त्या' महिला पोलिसाचा निर्धार!

'अर्ली डिटेन्शन अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट' या दुसुत्रीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे काम सुरू आहे. म्हणजेच तातडीने निदान आणि योग्य उपचार हे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या यशाचे फलित आहे. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचा तीन दिवसांच्या आत कोरोनाचा नमुना घेतला जातो. पॉझिटिव्ह आल्यास त्याची रवानगी थेट वन अकादमी येथील कोविड केअर केंद्रात केली जाते. बहुतांश रुग्णांत कोरोनाचे कुठलेही लक्षणं दिसून येत नाहीत. अशांना याच केंद्रात पुढील दहा दिवस ठेवले जाते. तर तब्येत बिघडली तर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात दाखल केले जाते.

तसेच ज्या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार आहेत, ज्यांची ऑक्सीजन घेण्याची क्षमता ही 95 पेक्षा कमी आहे तसेच जे वृद्ध आहेत. त्यांना देखील याच उपचार केंद्रात दाखल केले जाते. सर्वांचे एक्सरे आणि रक्ताच्या इतर तपासण्याही आवर्जून करण्यात येतात. त्यामुळे रुग्णाला तातडीचा उपचार मिळू शकतो. या 'टू टायर पद्धतीने'च जिल्ह्यात एकाही रुग्णाचा अद्याप कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. एवढेच नव्हे तर एकाही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची देखील पाळी आलेली नाही. यापूर्वी तीन रुग्णांना कृत्रिम श्वास देण्यासाठी ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांनी कोरोनावर मात केली. सध्या एका महिलेला कृत्रिम श्वास द्यावा लागत आहे. त्यांनीदेखील कोरोनावर मात केली. मात्र, मधुमेह आणि इतर आजार असल्याने त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे. एकूणच हे चित्र अत्यंत आशादायक आहे. कोरोनाचा शून्य मृत्यूदर असलेला 'चंद्रपूर पॅटर्न' हा राज्याला एक नवी दिशा देणारा ठरला आहे.

हेही वाचा - राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा निर्णय... सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

काय आहे चंद्रपुरातील विशेष यंत्रणा

कोरोनाशी निपटण्यासाठी राज्य शासनाने 'थ्री टायर' यंत्रणा उभी केली आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी म्हणून प्रत्येक तालुक्यात कोविड केअर केंद्र तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशे 17 केंद्र कार्यरत आहेत. मात्र, यासाठी जिल्ह्यात आदर्श असलेल्या वन अकादमीत सर्वांना दाखल केले जाते. येथे आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होतात. अशा प्रकारचे कोविड केअर केंद्र हे राज्यात एकमेव आहे.

हे आहेत यशाचे भागीदार

सामूहिक योग्य नियोजन आणि समन्वय हे या परिणामाचे फलित आहे. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डीले, चंद्रपूर महापालिका आयुक्त मोहिते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गेहलोत आणि रुग्णाच्या उपचारासाठी दिवसरात्र सेवेत असणारी आरोग्य यंत्रणा यांना या यशाचे श्रेय जाते.

Last Updated : Jul 15, 2020, 6:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.