ETV Bharat / state

Narendra Modi : शिक्षण, आरोग्यसेवेचा सामूहिक विकास आवश्यक; मोदींच्या हस्ते हिमोग्लोबिनोपॅथी केंद्र, सिपेटचे उद्घाटन - Sipet inaugurated by Prime Minister

चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते ) हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटर, सिपेटचे ( CIPET ) लोकार्पण झाले. सिपेटद्वारे रोजगार निर्मिती ( Employment generation through CIPET ) तसेच हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरच्या ( Hemoglobinopathies Center ) माध्यमातून वैद्यकीय संशोधनाला ( Medical research ) नवी दिशा मिळणार आहे.

Narendra Modi
Narendra Modi
author img

By

Published : Dec 11, 2022, 6:03 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन पथदर्शी उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने झाले, नागपुरात ते आले असता हा सोहळा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, नागपूरात आज 11 योजनांचे लोकार्पण होत आहे. यात चंद्रपूरातील दोन संस्थांचा समावेश आहे. सिपेटद्वारे रोजगार निर्मिती ( Employment generation through CIPET ) हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरच्या ( Hemoglobinopathies Center ) माध्यमातून वैद्यकीय संशोधनात ( Medical research ) नवी दिशा मिळणार आहे.

सिपेट इमारतीचे उद्घाटन
सिपेट इमारतीचे उद्घाटन

शिक्षण, आरोग्यसेवेचा विकास करणे गरजेचे - शिक्षण, आरोग्यसेवेचा विकास हा सामुहिकरित्या होणे गरजेचे आहे. तरच वंचित घटक विकासाच्या प्रक्रियेत येऊ शकतात. चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू ( Fourth Industrial Revolution ) शकत नाही. या संधीचे सोने करण्यासाठी स्थायी विकास महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्या पायाभूत सुविधा अद्यावत करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले

सिपेटसह हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे लोकार्पण - नागपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी चंद्रपूर येथील कौशल्य विकासावर आधारीत रोजगार देणारी सिपेट ( Central Institute of Petrochemicals Engineering and Technology ), वैद्यकीय संशोधन करणाऱ्या हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे रिमोट दाबून लोकार्पण केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर येथे केंद्रीय रसायने, पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव दीपक मिश्रा, सिपेटचे महासंचालक शिशिर सिन्हा, चंद्रपूर सिपेटचे संचालक अवनीध जोशी, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत कुलकर्णी, सिपेटचे तांत्रिक संचालक श्री. मूर्ती, प्रशासकीय अधिकारी पंकज वाघमारे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात रोजगाराची नवीन संधी : सिन्हा तत्पुर्वी चंद्रपूर येथे सिपेटचे महासंचालक श्री. सिन्हा म्हणाले, या संस्थेचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. चंद्रपूर येथील सिपेट ही संस्था देशातील 46 वी संस्था आहे. 54 वर्षात या संस्थेने कौशल्य विकासावर आधारीत रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविले असून प्लास्टिक क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. येथे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण होणारे 90 टक्क्के विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहे. राज्य, केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने चालणारी ही संस्था चंद्रपूर, आदिवासी क्षेत्रासाठी रोजगाराची नवी संधी आहे, असे त्यांनी सांगितले.

काय आहे नेमकी सिपेट संस्था - सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन, पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन, खते मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित संस्था आहे. संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत आहे. तसेच प्लास्टिक क्षेत्रातील संबंधित उद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, तांत्रिक, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.

87 टक्के प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार - महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्लास्टिक संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन, कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी, या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सिपेट संस्था सुरु करण्यात आलेली आहे. सद्यस्थितित सिपेट, चंद्रपुर येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या डिप्लोमा कोर्सेसमध्ये तीन वर्ष कालावधी असलेले डिप्लोमा इन प्लास्टिक्स टेक्नोलॉजी (DPT), डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (DPMT) हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत.

रोजगारांच्या संधी - डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच विदेशात देखील बहुराष्ट्रीय प्लास्टिक उद्योग (मल्टीनेशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज) मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच सिपेट चंद्रपूरमधून कौशल्य विकास योजनांतर्गत आतापर्यंत जवळपास 4 हजार 280 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यापैंकी 3 हजार 722 म्हणजेच 87 टक्के विद्यार्थ्यांना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम लि., वॅरोक पॉलीमर प्रा.लि., जाबील सर्किट इंडिया प्रा.लि., आरसी प्लास्टो प्रा.लि. या व इतर नामांकित कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

माजी मंत्री हंसराज अहिर यांचे महत्वपूर्ण योगदान - युपीए सरकारच्या काळात हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नांतून या केंद्राला मान्यता प्रदान करण्यात आली होती. परंतु निधीअभावी हे काम पुर्णत्वास गेले नव्हते. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळात भरीव निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम पुर्णत्वास येवून त्याचे लोकार्पणही मोदींच्या हस्ते संपन्न झाले. सन 2016 मध्ये हंसराज अहीर केंद्रीय रसायन, उर्वरक राज्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरात सिपेटची उभारणी करण्यात आली होती. 2017 मध्ये वेकोलि दुर्गापूर वर्कशॉपमध्ये हे केंद्र प्रायोगिक सुरु झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या केंद्राच्या इमारतीचे भुमीपूजन केले होते.

सिकलसेलग्रस्त रुग्णांना मदत - केंद्र सरकारने सिपेट इमारतीसाठी निधी मंजुर करुन प्रशस्त इमारत उभारली. 'चंद्रपूरकरांच्या आनंदात भर घालणारा हा क्षण असून या आनंदात आपण सहभागी असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. तसेच सिकलसेल सेंटरमुळे रक्तसंबंधीत विविध आजारावर संशोधन होणार असल्याने सिकलसेलग्रस्त रुग्णांना हे केंद्र तसेच बेरोजगारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यास सिपेट वरदान ठरेल' अशी भावना अहीर यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.