ETV Bharat / state

Manager Suicide : वेकोलीच्या व्यवस्थापनकाने केली आत्महत्या, सीबीआयने लाच घेताना केली होती अटक - committed suicide by hanging himself

चंद्रपूर वेकोली क्षेत्रातील डीआरसी खाणीतील व्यवस्थापकाची कार्यालय समोरील हनुमान मंदिरात आज गुरुवार (दि. 12 जानेवारी)रोजी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने वेकोलीत खळबळ उडाली. दिनेश कराडे (46) असे मृत अधिकाऱ्यांचे नाव असून तो वेकोली मध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. मात्र, ते निलंबीत होते. यांच्यावर 14 ऑक्टोबर 2022 ला सीबीआयने पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती.

Manager Suicide
व्यवस्थापनकाची आत्महत्या
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:57 PM IST

चंद्रपूर : सीबीआयने कारवाई झाल्यानंतर मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. पुढील, तपास शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे करत आहेत. या घटनेमुळे कोळसा खाण व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरालगत महाकाली कोळसा खाण आहे. या खाणीचे व्यवस्थापक म्हणून दिनेश कराळे कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी कराळे यांच्याकडे सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निलंबित केले होते. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळाली : आज दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास व्यवस्थापक दिनेश कराळे हे वेकोलिच्या महाप्रबंधक कार्यालयाकडे गेले. त्यानंतर या कार्यालयाशेजारील मंदिराच्या बाजुला असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर खाण परिसरात मोठी खळबळ उडाली. वेकोली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.

मानसिकस्थिती चांगली नसल्याची चर्चा : घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांना मृतदेहाच्या खिशात दोन पानांची चिठ्ठी आढळून आली. आत्महत्येचे कारण सध्या समजू शकले नाही. पोलिसांकडून सुसाईट नोटच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर मागील तीन महिन्यांपासून त्यांची मानसिकस्थिती चांगली नसल्याची चर्चा आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

CBI ची कारवाई झाली होती : दिनेश कराडे यांना व्यवस्थापक पदावरून निलंबीत करण्यात आले होते. त्यांना 14 ऑक्टोबर 2022 ला CBI ने 5 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्या घटनेनंतर त्यांना बदनामिला सामोरे जावे लागत होते. या काळात लोकांमध्येही त्यांनी लाच घेतली अशी चर्चा होती. दरम्यान, CBI ची कारवाई झाल्यानंतर मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे करत आहेत.

हेही वाचा : धक्कादायक.. दहा वर्षांच्या मुलाने शेतात घेऊन जात केला आठ वर्षीय मुलीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.