ETV Bharat / state

Chandrapur Nagar Panchayat Election : चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदावर महाविकास आघाडीची बाजी - Mahavikas Aghadi won election

पोंभुर्णा ( Pobhurna Nagar Panchayat election result ) येथे भाजपचा झेंडा फडकला. कोरपना, सिंदेवाही आणि सावलीमध्ये कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. जिवतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस सोबत आले. गोंडपिपरीत कॉंग्रेसला शिवसेनेची साथ घ्यावी ( Gondpimpari result ) लागली. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सतरा सदस्यीय कोरपना नगरपंचायत मध्ये कॉंग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आहे. भाजप चार आणि शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे.

Chandrapur Nagar Panchayat Election
Chandrapur Nagar Panchayat Election
author img

By

Published : Feb 17, 2022, 10:31 PM IST

चंद्रपूर - नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. केवळ एका नगरपंचायत वगळता सर्व ठिकाणी महाविकास आघाडीने सत्ता स्थापित केली आहे.

पोंभुर्णा ( Pobhurna Nagar Panchayat election result ) येथे भाजपचा झेंडा फडकला. कोरपना, सिंदेवाही आणि सावलीमध्ये कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. जिवतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस सोबत आले. गोंडपिपरीत कॉंग्रेसला शिवसेनेची साथ घ्यावी लागली. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सतरा सदस्यीय कोरपना नगरपंचायत मध्ये कॉंग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आहे. भाजप चार आणि शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे.

हेही वाचा-Congress Leaders Meet CM Thackeray : निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले

कोरपनामध्ये बावणे परिवाराची एकहाती सत्ता ( Korpana Nagar Panchayat election result )

कॉंग्रेसचा उमेदवार कोरपन्याचा प्रथम नागरिक होईल, असे चित्र स्पष्ट असतानाही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात उतरविले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. कॉंग्रेसच्या नंदाताई बावणे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून इस्माईल रसूल शेख विजय झाले. या दोघांनाही प्रत्येकी १२ मते मिळाले. बावणे आणि शेख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या भाजपच्या वर्षा लांडगे आणि आशा झाडे यांना प्रत्येकी पाच मतांवर समाधान मानावे लागले, यानिमित्ताने कोरपना शहराच्या राजकारणात बावणे परिवाराने पुन्हा आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

हेही वाचा-KCR to Meet CM Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री ठाकरेंची घेणार भेट; विरोधकांची मोट बांधण्याचा नवा प्रयत्न

पोंभूर्णा नगर पंचायतमध्ये अध्यक्षपदी भाजपच्या सुलभा पिपरे
पोंभूर्णा नगर पंचायतच्या अध्यक्षपदी भाजपच्या सुलभा पिपरे निवडून आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या रामेश्वरी वासलवार यांचा पराभव केला. पिपरे यांनी दहा तर वासलवार यांना सात मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा दहा विरुद्ध सात असे चित्र राहिले. भापजचे अजित मंगळगिरीवार यांनी बहुजन वंचित आघाडीच्या रिना उराडे यांचा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव केला. या नगर पंचायतमध्ये भाजपचे दहा, सेना चार, बहुजन वंचित आघाडीचे दोन आणि कॉंग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे.

हेही वाचा-अनाथ शबानाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर; महाविद्यालयात मिळाला ‘एमबीबीएस’ला प्रवेश

सिदेंवाहीसुद्धा कॉंग्रेसकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद

सिदेंवाहीसुद्धा कॉंग्रेसचे उमेदवार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडून आले. अध्यक्षपदी स्वप्नील कावळे आणि उपाध्यक्ष म्हणून मयुर सूचन विजय झाले. कावळे यांच्या विरोधात भाजपचे किशोर भरडकर रिंगणात उतरले होते. कॉग्रेसचे १३ आणि अपक्ष एक असे एकूण चवदा नगरसेवकांनी हात उंचावून कावळे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा भरडकर यांना मिळाला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे मयूर सूचक यांना १४ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील भाजपचे दीपा पुस्तोडे यांना तीन मतांवर समाधान मानावे लागले. जिवती नगर पंचायतमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली. या दोन्हा पक्षांचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडून आले.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद, गुरुवारी २५९ नवे रुग्ण

गोंडवना गणतंत्र पक्षाचा सपशेल पराभव

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कविता आडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. तर कॉंग्रेसचे डॉक्टर अंकुश गोतावळे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. या दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाली. गोंडवना गणतंत्र पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लक्ष्मीबाई जुमनाके यांना मैदानात उतरविले. त्यांना केवळ पाच मतांवर समाधान मानावे लागले.

गोंडपिपरी नगरपंचायतीवर कॉंग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता ( Gondpinpari Nagar panchayat election )
गोंडपिपरी नगरपंचायतीवर कॉंग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता आली. अध्यक्षपदी सविता कुळमेथे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका मडावी निवडून आल्या आहेत. सतरा सदस्यीय या नगरपंचायतीत सात काँग्रेस, चार भाजप, दोन सेना, दोन राष्ट्रवादी व दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना व अपक्षांनी काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसच्या उमेदवार सविता कूळमेथे यांना 11 तर भाजप उमेदवार मनीषा मडावी यांना 6 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही उमेदवारांना भाजपच्या पारड्यात मते टाकली. परंतु त्याचा भाजपला काहीच लाभ झाला नाही. सावली नगरपंचायतमध्ये कॉंग्रेसच्या लता वाकडे अध्यक्ष तर संदीप पुण्यापकार यांचा उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. या नगरपंचायतमध्ये कॉंग्रेसला १७ पैकी १४ जागा मिळाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.