चंद्रपूर - चंद्रपूर शहराजवळील वेकोली वसाहतीत मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दुर्गापूर जवळील वेकोलीच्या शक्तीनगर वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. अनेकांना या बिबट्याचे संध्याकाळच्या वेळी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
नागरिकांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची तक्रार वनविभागाकडे केली होती. मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला. या परिसरात बिबट्या आढळून आल्याने, वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला जेरबंद केले. पकडलेला बिबट्या मादी असून, तिचे वय अंदाजे 4 वर्ष असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.