ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: शेतकऱ्याची तक्रारीची अखेर दखल, लिकेज दुरुस्तीला सुरुवात - ईटीव्ही भारतच्या बातमीचा इम्पॅक्ट

गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी श्रीराम काळे यांच्या शेतालगत धाबा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन गेल्या अनेक वर्षांपासून लीक होती. अशात शेतात लिकेजमधून पाणी सतत झिरपत होते. त्यामुळे, शेतात टाकलेले बियाणे, कोवळी पिके कुजून जात होती.

leakage repair started in chandrapur
लिकेज दुरुस्तीला सुरुवात
author img

By

Published : Jun 21, 2020, 6:40 PM IST

चंद्रपूर - एका शेतकऱ्याच्या शेतालगत असलेली धाबा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन तीन वर्षांपासून लीक होती. त्यातून सतत पाणी झिरपत असल्याने शेतातील पिकांची मुळे कुजून जात होती. परिणामी शेतकऱ्याला दरवर्षी मोठा आर्थिक फटका बसायचा. लिकेज दुरस्त करा, या मागणीसाठी शेतकऱ्याची कार्यालयात पायपीट सुरु होती. मात्र, लिकेज दुरुस्तीकडे विभागाचे सातत्याने दूर्लक्षच झाले होते. या शेतकऱ्याची व्यथा ईटीव्ही भारतने शनिवारी मांडली होती. याची तात्काळ दखल घेण्यात आली असून रविवारी पहाटेपासूनच लिकेज दुरस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी श्रीराम काळे यांच्या शेतालगत धाबा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन गेल्या अनेक वर्षांपासून लीक होती. अशात शेतात लिकेजमधून पाणी सतत झिरपत होते. त्यामुळे, शेतात टाकलेले बियाणे, कोवळी पिके कुजून जात होती. शेतात जाणाऱ्या मार्गावरच लिकेज असल्याने ये-जा करण्यासाठी काळे यांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत काळे यांनी चंद्रपूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, विभागाने त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

या प्रकाराची बातमी ईटीव्ही भारतवर शनिवारी प्रकाशित झाली. प्रकाशित वृत्ताची तात्काळ दखल घेण्यात आली असून आज पहाटेपासूनच लिकेज दुरस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे, लिकेजच्या पाण्याने दरवर्षी होणारे शेतीचे नुकसान आता टळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.