ETV Bharat / state

strike against Commissioner Mohite : शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार; आयुक्त मोहिते यांच्या विरोधात लक्ष्मण पवार यांचे आमरण उपोषण

आश्रमशाळेला मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून 15 लाखांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर लातूर येथील लक्ष्मण पवार या गृहस्थाने केला आहे. माझ्या हक्काचे पैसे मिळेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी संघर्ष करणार (Will fight till the last breath) असा इशारा लक्ष्मण पवार यांनी दिला असून; आजपासुन ते यासाठी आमरण उपोषणाला (Laxman Pawar hunger strike against Commissioner Mohite) बसले आहे.

strike against Commissioner Mohite
लक्ष्मण पवार
author img

By

Published : Sep 23, 2022, 5:38 PM IST

चंद्रपूर : आश्रमशाळेला मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून 15 लाखांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर लातूर येथील लक्ष्मण पवार या गृहस्थाने केला आहे. माझ्या हक्काचे पैसे मिळेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी संघर्ष करणार (Will fight till the last breath) असा इशारा लक्ष्मण पवार यांनी दिला असून; आजपासुन ते यासाठी आमरण उपोषणाला (Laxman Pawar hunger strike against Commissioner Mohite) बसले आहे. पवार यांच्या भूमिकेमुळे आयुक्त मोहिते यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झालेली आहे. मोहिते गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर असून त्यांचा फोन देखील संपर्काच्या बाहेर दाखवत आहे.

पवार यांचा आरोप : 2017 मध्ये युतीच्या सरकारमध्ये राजकुमार बडोले हे सामाजिक न्यायमंत्री असताना राजेश मोहिते हे त्यांचे स्वीय सहायक होते. यावेळी लक्ष्मण पवार यांच्या आश्रमशाळेला शासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी पवार यांच्याकडून मोहिते यांनी 14 लाख 70 हजारांची लाच घेतली, असे लक्ष्मण पवार यांचे म्हणणे आहे. मूळचे लातूर येथील पवार हे 19 ऑगस्टला याच कारणासाठी चंद्रपूरात आले होते आणि मनपा आयुक्त मोहिते यांच्या कॅबिनमध्ये स्वतःवर चाकूहल्ला करीत पवार यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मोहिते यांनी पैसे परत करण्याऐवजी एका खासगी कंपनीत कायमची नोकरी आणि दिव्यांग मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचा शब्द दिला होता, आता मात्र त्यांनी घुमजाव केल्याचा आरोप पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला होता.

पवार आले परत : यानंतर शहर पोलीस ठाण्यात पवार यांच्यावर आत्महत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी त्यांना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सोडले होते, तसेच पुन्हा परत येऊ नकोस असा दमही दिला होता. मात्र पवार यांनी याला न जुमानता पुन्हा चंद्रपुरात दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना लक्ष्मण पवार

पवार यांचे आमरण उपोषण : लक्ष्मण पवार हे आज बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोवर आयुक्त मोहिते यांच्याकडून त्यांना पैसे मिळत नाही तोवर आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. मोहिते यांनी जे पैसे घेतले त्यात आमची होती नव्हती ती मिळकत गेली. वडिलांचा लाच घेण्याच्या चिंतेत हृदयविकाराने मृत्यू झाला तर आता दिव्यांग मुलाचा उपचार आणि कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक आधार नाही, अशावेळी मला पैसे परत मिळाल्याशिवाय मी जाणार नाही, असे पवार यांचे म्हणने आहे. याबाबत आयुक्त मोहिते यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.