चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 667 नव्या रुग्णांची भर पडली असून 28 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1 हजार 415 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या 16 हजार 584 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 823 झाली आहे.
शहरात मृत्यू झालेल्यांमध्ये रामनगर येथील 70 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील 49 वर्षीय पुरुष तसेच 37 व 61 वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील 52 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील 62 व 72 वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला, भिवापूर येथील 78 वर्षीय पुरुष.
वरोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, खापरी येथील 76 वर्षीय महिला, मासळ येथील 50 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, तळोधी येथील 65 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील 75 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, भंडारा येथील 58 वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तर आज बाधित असलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 119, भद्रावती 177, ब्रम्हपुरी 69, नागभीड 88, सिंदेवाही 57, मूल 58, सावली 26, पोंभूर्णा 19, गोंडपिपरी 49, राजूरा 107, चिमूर 60, वरोरा 205, कोरपना 142, जिवती 11 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.