ETV Bharat / state

परिचारिका छाया पाटील यांना राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - Chandrapur Health Department News

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यक आशा गजरे यांना राष्ट्रीय फ्लोरेंस नाटिंगेल पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.

Hostess chhaya Patil received the National Florence Nightingale Award from the President
परिचारिका छाया पाटील यांना राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार
author img

By

Published : Dec 6, 2019, 4:39 AM IST

चंद्रपूर - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्हयातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार-2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारीका, परिचारीका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहाय्यीकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. राज्यातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्ष सेवा दिली, तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्य सेवेते कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी, तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे, आदि केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रीय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका वठवली आहे, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्हयात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

Intro: चंद्रपूर : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्हयातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार-2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारीका, परिचारीका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहाय्यीकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. राज्यातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्हयातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हयातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्ष सेवा दिली तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्य सेवेते कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. श्रीमती पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे आदि केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रीय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात श्रीमती पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका वठवली आहे. तसेच, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्हयात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.