ETV Bharat / state

Goons Beaten By Police In Chandrapur : तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड - चंद्रपुरात पोलिसांनी गुंडांना चोपले

चंद्रपूर शहरातल्या संत तुकाराम वॉर्ड, आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या ( Goons In Chandrapur City ) परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. ज्या भागात दहशत करत होते त्याच भागात नागरिकांसमोर चोप दिल्याने ( Goons Beaten By Police In Chandrapur ) हे गुंड गयावया करू लागले होते. गुंडांनी नागरिकांची माफी मागितल्याने त्यांच्यावर चांगलीच जरब बसणार ( Goons Apologized In Chandrapur ) आहे.

तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांची पोलीसांनी काढली धिंड

author img

By

Published : Apr 19, 2022, 7:39 PM IST

चंद्रपूर : संत तुकाराम वॉर्ड, आंबेडकर नगर आणि बाबूपेठ या परिसरात तलवारी, चाकूचा धाक दाखवून सामान्य लोकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना ( Goons In Chandrapur City ) चंद्रपूर पोलिसांनी चांगलाच चोप दिला. या गुंडांना जिथे त्यांची दहशत आहे त्याठिकाणी जाऊन सर्व लोकांसमोर या गुंडांची धिंड काढून चोप देण्यात ( Goons Beaten By Police In Chandrapur ) आला. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच हे गुंडांनी हात जोडून लोकांची क्षमा ( Goons Apologized In Chandrapur ) मागितली. पोलिसांनी एकाच झटक्यात या गुंडांना अद्दल घडविल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टोळीने घातला होता धुमाकूळ : चंद्रपूर शहरातील संत तुकाराम वॉर्ड, आंबेडकर नगर, बाबूपेठ या परिसरात गुंडांच्या एका टोळीने धुमाकूळ घातला होता. अनेक गुन्हे असलेल्या या गुंडांनी सामान्य नागरिकांत कमालीची दहशत निर्माण केली होती. क्षुल्लक कारण काढून तलवार, सुरे घेऊन कुणाच्याही घरात हे गुंड घुसून प्राणघातक हल्ला करत होते. प्रेम नायक, अमोल ठावरी, साहिल पाझारे अशा अनेक निर्दोष सामान्य नागरिकांवर तलवार, चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हातात शस्त्र घेऊन हे गुंड परिसरात मुक्तसंचार करत होते. त्यामुळे यांच्या विरोधात कुणालाही बोलण्याची हिम्मत होत नव्हती.

तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

तक्रार करणाऱ्यावर करायचे हल्ला : यापूर्वी काही लोकांनी पोलिसांत जाऊन तक्रार केली होती मात्र याचं पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे या गुंडांचा आत्मविश्वास आणखी दुणावला होता. त्यामुळे जो तक्रार करायला जाईल त्याच्यावर जीवघेणा हल्ला हे गुंड करायचे. रविवारच्या रात्री असाच हल्ला या गुंडांनी केला असताना अखेर सामान्य नागरिक एकवटले आणि त्यांनी याचा विरोध करत त्यांना पिटाळून लावले. यानंतर सामान्य नागरिक एकवटले आणि त्यांनी याबाबतची हकीकत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना सांगितली. त्यांनी याची तत्काळ दखल घेत थेट पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी संपर्क करून ही बाब कानावर घातली. तसेच यावर तत्काळ ठोस पावले उचलण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी या सामान्य नागरिकांना तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले.

नागरिकांसमोर दिला चोप : त्यानुसार रात्री रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या चमूने या गुंडांना ताब्यात घेतले. दोघांना केवळ अटक न करता एकरे यांनी या गुंडांना घेऊन संत तुकाराम वॉर्ड गाठला. तिथे सर्वसामान्य नागरिकांसमोर या दोघांना चांगलाच चोप दिला. पोलिसी खाक्या दाखवताच हे गुंड सामान्य नागरिकांनासमोर विनवणी करायला लागले. यानंतरदेखील या गुंडांपैकी कोणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तर, थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन देखील एकरे यांनी केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे येथील सामान्य नागरिकांना मोठा दिला मिळाला आहे.

हेही वाचा : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीचा दणका; पुणे पोलिसांनी कोयता गँगची काढली धिंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.