चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्राचीन जीवश्म असल्याची नोंद भूशास्त्र विभागात होती. मात्र काही ठोस असे जिवाष्मे या परिसरात मिळाली नव्हती, मात्र भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात संशोधन करत होते, अखेर त्यांना यात मोठे यश आले असून त्यांनी तब्बल 20 कोटी वर्षांपूर्वीचे जीवश्म शोधून काढले आहे. ही जिवाष्मे डायनसोर युगातले असून झाडाच्या पानांची जिवाष्मे आहेत. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील एका शेतीच्या परिसरात ही जिवाष्मे आढळली.
ग्लासोप्टेरिस झाडाची वनस्पती आढळली : चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती जवळ जुरासिक ते पर्मियन ह्या 28 ते 19.5 कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ग्लासोप्टेरिस (Glassopteris) ह्या प्रजातीच्या वनस्पती होत्या. ह्यापूर्वी त्यांनी डायनोसॉर, हत्ती, स्ट्रोमॅटोलाईट, शंख शिंपले, वृक्ष आणि पानांचे जिवाश्म चंद्रपुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आढळली आहेत. प्रा. चोपणे यांनी ती आपल्या घरी संग्रहित करून ठेवली आहेत. चोपणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जीवाश्म शोधत आहेत.
नवीन इतिहासाला उजाळा : यापूर्वी भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती आणि जंगलात काही ठिकाणी काही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत. चोपणे यांनी भद्रावती, वरोरा परिसरात डायनोसॉरची जिवाष्मे शोधून काढली होती. आता ह्या त्याहीपेक्षा जुन्या २० कोटी वर्षे जुन्या जुरासिक काळातील जिवाष्मे आढळल्यामुळें नवीन इतिहासाला उजाळा मिळाला आहे. ह्या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती. परंतू चांगली जीवश्म मिळाली नव्हती. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास तीन ते सहा कोटी वर्षे जुने खडक आढळतात, तर २५ कोटी ते २५ हजार वर्षे प्राचीन जिवाष्मे आढळतात.
चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती जवळ जुरासिक ते पर्मियन ह्या 28 ते 19.5 कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ग्लासोप्टेरिस (Glassopteris) ह्या प्रजातीच्या वनस्पती होत्या. ह्यापूर्वी त्यांनी डायनोसॉर, हत्ती, स्ट्रोमॅटोलाईट, शंख शिंपले, वृक्ष आणि पानांचे जिवाश्म चंद्रपुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आढळली आहेत. - भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे
काय आहे पार्श्वभूमी : २० कोटी वर्षादरम्यान जेव्हा हे वृक्ष जिवंत होते. तेव्हा विशाल डायनोसॉर देखील जिवंत होते. तेव्हा पृथ्वीवर पांजिया नावाचा एकच खंड होता. भारत हा भूप्रदेश आजच्या आस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारताच्या, चीनच्यामध्ये टेथीस नावाचा समुद्र होता. पुढे कोट्यवधी वर्षाने भारत भूखंड उत्तरेला सरकत गेला. त्यातर त्याने चीनच्या भूखंडाला टककर दिली. ह्यातून हिमालय निर्माण झाला. अजूनही भूकवचाची ही गती उत्तरेकडे सरकत आहे.
वनस्पतीचे जिल्ह्यातील सर्वात प्राचीन जीवश्म : डायनसोरचा काळ हा 19 ते 23 कोटी वर्ष जुना आहे. त्या काळात वनस्पती देखील होत्या. ज्याचे भक्षण डायनोसॉर करत होते. यापूर्वी कोठारी येथे एका वनस्पतीचे जीवश्म आढळले होते.
आयरन ऑक्साईडचे जीवश्म : सामन्यत चुनखडी किंवा मातीपासून बनलेले जीवश्म आढळतात. मात्र हे पानाचे जीवश्म आयरण ऑक्साईडपासून बनलेले आहे. पूर्वी येथे समुद्र असल्याने येथे या रसायनाचे प्रमाण सर्वाधिक होते. काळानुसार याच्यावर या रसायनाचा थरवर थर साचत गेला आणि यापासून हे जीवश्म तयार झाले.
चंद्रपुरातील दीडशे कोटी वर्षापूर्वीचे जीवाश्म : चंद्रपुरात दीडशे कोटी वर्षांपूर्वीचे देखील जीवाश्म आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले हे सर्वात प्राचीन जीवाश्म आहेत. मात्र, त्यावेळी सजीव सृष्टी अस्तित्वात नसल्याने हे जीवाश्म स्टोमॅटोलाईट या प्रकारच्या बॅक्टेरियाचे असल्याचे समोर आले.
हेही वाचा -