ETV Bharat / state

तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेत खोडतोड, गायत्री परिवाराच्या पुस्तकावर कारवाईची मागणी

गायत्री परिवाराने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील प्रार्थनेत खोडतोड करण्यात आल्याचा आरोप श्री गुरुदेव युवा मंचाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रार्थनेत तुकडोजी महाराज यांचा उल्लेख करण्यात आला नसल्याने युवा मंचचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

author img

By

Published : Jul 6, 2019, 8:11 PM IST

श्री गुरुदेव युवा मंचाचे कार्यकर्ते

चंद्रपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना सर्वश्रुत आहे. मात्र, गायत्री परिवाराने प्रकाशित केलेल्या पुस्तकात ह्या प्रार्थनेत खोडतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातही यात तुकडोजी महाराज यांचा उल्लेख करण्यात आला नाही. यावर श्री गुरुदेव युवा मंचाच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला असून प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्री गुरुदेव युवा मंचाचे कार्यकर्ते

देश आणि देशाबाहेर गायत्री परिवाराचे अध्यात्मिक जाळे पसरले आहे. पंडीत श्रीराम शर्मा आचार्य यांच्या संकल्पनेतून या परिवाराची स्थापना करण्यात आली आहे. गायत्री परिवाराचे संपुर्ण सूत्र प्रवीण पंड्या यांच्याकडे आहे. या परिवाराचे साहित्य मुबलक प्रमाणात प्रकाशीत झाले आहे. परिवाराचे 'विद्यार्थी जीवनात जगण्याची कला' असे एक पुस्तक आहे. त्याच्या पान क्रमांक 85 वर "है प्रार्थना गुरुदेव से" ही तुकडोजी महाराज रचित प्रार्थना मोडूनतोडून प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात अनेक बदल करण्यात आले. तसेच "तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संस्कार में" ही महत्त्वाची ओळच गाळण्यात आली. एवढेच नव्हे, तर प्रार्थनेच्या शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा उल्लेखही करण्यात आला नाही. यावर श्री गुरुदेव युवा मंचच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने याची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, प्रकाशकाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत मंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, विश्वास पानघाटे, पंजाब मेश्राम आदी उपस्थित होते.

Intro:चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सामुदायिक सर्वश्रुत आहे. मात्र, गायत्री परिवाराने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात ह्या प्रार्थनेत खोडतोड करण्यात आली. त्यातही यात तुकडोजी महाराज यांचा उल्लेख करण्यात आला. यावर श्री गुरुदेव युवा मंचाच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला असून प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Body:देश आणि देशाबाहेर गायत्री परीवारचे अध्यात्मिक जाळे पसरले आहे. पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या संकल्पनेतुन याची स्थापना करण्यात आली असून अलीकडे गायत्री परिवाराचे संपुर्ण सूत्र प्रवीण पंड्या यांच्याकडे आहे. या परिवाराचे साहित्य मुबलक प्रमाणात प्रकाशित झाले आहे. त्यातील एक पुस्तक 'विद्यार्थी जीवनात जगण्याची कला' असे असून त्याच्या पान क्रमांक 85 वर "है प्रार्थना गुरुदेव से" ही तुकडोजी महाराज रचित प्रार्थना मोडून तोडून प्रकाशित करण्यात आली. त्यात अनेक बदल करण्यात आले. तसेच "तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संस्कार में" ही महत्त्वाची ओळच गाळण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रार्थनेच्या शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा उल्लेखही करण्यात आला नाही. यावर श्री गुरुदेव युवा मंचच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने याची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रकाशकाने जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत मंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, विश्वास पानघाटे, पंजाब मेश्राम उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.