ETV Bharat / state

Fraud with farmers in Chandrapur : बोगस बियाणांची विक्री करुन चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक - District Agriculture Department

चंद्रपूर (Chandrapur)जिल्हयात शेतकऱ्यांनी (Fraud with farmers in Chandrapur) खरेदी केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिध्द झालयं. कृषीविभागाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले 139 पैकी आठ नमुने हे बोगस असल्याचे समोर आले. या कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावली (Agriculture dept. has issued notices to these companies)आहे.

bogus seeds
बोगस बियाणे
author img

By

Published : Jul 10, 2022, 7:53 PM IST

चंद्रपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी (Fraud with farmers in Chandrapur) जे बियाणे आणि खते खरेदी केले होते, ते बोगस (Fraud with farmers by selling bogus seeds) असलाच्या तक्रारी जिल्हा कृषी विभागाला (District Agriculture Department) प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने घेत खतांचे 139 तर बियाण्यांचे 307 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी खतांच्या 139 पैकी आठ नमुने हे बोगस असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस (Agriculture dept. has issued notices to these companies) बजावली आहे, तर बियाण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यात मोहीम राबवून रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. जवळपास १३९ खतांचे नमुने अमरावती येथील रासायनिक खत तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 139 पैकी आठ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.

अशी आहे तपासणी यंत्रणा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती स्तरावरली कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत खताचे नमुने घेतले जातात. कृषी सेवा केंद्र व सहकारी सोसायट्यामार्फत रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येतो. खत कंपन्यांकडून खतात मूलद्रव्यांचे प्रमाण नमूद असते. मात्र, काही कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या माथी खते मारतात. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने खते निरीक्षक घोषित केले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांतील कृषी अधिकारी आणि जिल्हा गुण नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाभरातून खताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. कृषी विभागातील पथकाचे कर्मचारी एकावेळी तीन नमुने घेतात. त्यातील एक नमुना त्यांच्याजवळ, तर दुसरा कृषी केंद्रात ठेवण्यात येतो. तिसरा नमुना प्रयोगशाळेत पाठविला जातो. पथकामार्फत शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेच्या निविष्ठा मिळण्यासाठी ही कार्य मोहीम राबविली जाते.

कंपन्यांकडून मूलद्रव्यात फेरबदल : मात्र, काही खत व बियाणे कंपन्यांकडून मूलद्रव्यांच्या प्रमाणात फेरबदल केल्या जाते. त्याचा परिणाम होऊन पिकांना पाहिजे असलेली मात्रा मिळत नाही. दरम्यान, नमुने अप्रमाणित असलेल्या कंपन्या विभागीय कृषी सहसंचालकांकडे अपिल करू शकतात.

बियाणे नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा : जून महिन्यात जिल्ह्यात थोडाबहुत पाऊस झाला. पुढे चांगला पाऊस होईल, या आशेवर जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, धान, कापसाच्या पेरणी केल्या. मात्र, कित्येक दिवस उलटल्यानंतरही बियाणे उगविले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने बांध्यावर जाऊन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. सोयाबीन, कापूस, धान आणि तुरीचे ३०७ नमुने घेण्यात आले. हे नमुने नागपुरातील बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.

हेही वाचा: Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली, टोमॅटो, काकडीचे दर वाढले.. इतर भाज्यांचे दर स्थिर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.