चंद्रपूर - गोंडपिंपरी तालुक्यातील सुरगाव येथे एका कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागली. या आगीत चार ते पाच लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला. येथील मजूरांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ही घटना घडली.
सुरगाव येथे शाम जिनिंग नावाची कापसाची मोठी जिनिंग आहे. आज सकाळी जिनिंगमध्ये अचानक आगीने भडका घेतला. जिनिंगमधील मजुरांच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र, तोपर्यंत बराच कापूस जळून गेला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोंडपिंपरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.