ETV Bharat / state

चंद्रपुरात युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या; कारण अस्पष्ट

author img

By

Published : Jul 10, 2020, 5:07 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेनेरी येथील युवा शेतकरी भारत शंकर जांभुळे (३५) याने गोठ्यात फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.

farmer suicide in chimur taluka chandrapur
शेतकरी आत्महत्या चिमूर तालुका चंद्रपूर

चिमूर (चंद्रपूर) - चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेनेरी येथील युवा शेतकरी भारत शंकर जांभुळे (३५) याने गोठ्यात फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत शेतकरी भारत जांभुळे याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंबेनेरी या गावातील भारत शंकर जांभुळे रोजच्या दिनचर्येप्रमाणे ११ वाजता शेतात गेला. त्याच्या कुटूंबातील एक वृद्धा मृत्यू झाल्याने तिच्या अंत्यविधी आणि अस्थी विसर्जनाकरीता सर्व कुटूंबीय, नातलग बाहेर गेले होते. सांयकाळी च्या सुमारास सर्व कुटूंबीय घरी आले. भारत शेतातुन घरी आला काय, म्हणुन नातलगांनी चौकशी केली असता तो घरी आला नसल्याचे समजले.

हेही वाचा - खळबळजनक..! जादूटोण्याच्या संशयातून अमरावतीच्या सांभोऱ्यात बाप-लेकाची हत्या

भारत याचा पुतण्या पंकज शरद जांभुळे आपल्या काकाला पाहायला शेतात गेला असता, त्याला शेतातील झोपडीवजा गोठ्यात भारत गळफास घेऊन लटकलेला दिसले. त्याने धावत जाऊन ही धक्कादायक माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय आणि पोलीस-पाटील घटनास्थळावर पोहोचले. पोलीस पाटलांनी सदर घटनेची माहिती भिसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवला. भिसी पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.