ETV Bharat / state

Aaditya Thackeray On Chandrapur Pollution : चंद्रपूरच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता - चंद्रपुरातील अवैध कोळसा डेपो

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज चंद्रपूर दौऱ्यावर आले ( Aaditya Thackeray Chandrapur Visit ) होते. यावेळी त्यांनी चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. चंद्रपुरातील अवैध कोळसा डेपोबाबत ( Illegal Coal Depot At Chandrapur ) लवकरच योग्य ती पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी ( Aaditya Thackeray On Chandrapur Pollution ) सांगितले.

author img

By

Published : Feb 13, 2022, 8:06 PM IST

चंद्रपूर : चंद्रपुरचा प्रदूषणाचा मुद्दा आहेच. मी स्वतः येथे येताना हे सर्व पाहिलं आहे, असं म्हणत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त ( Aaditya Thackeray On Chandrapur Pollution ) केली. आज चंद्रपुरच्या दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Chandrapur Visit ) असताना त्यांनी हे वक्तव्य केले. रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाची पाहणी तसेच गोंडकालीन किल्ल्याची पाहणी करण्यासाठी ते येथे आले होते.

चंद्रपूरच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

रामाळा तलावाची केली पाहणी

सायंकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे रामाळा तलावाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली. यावेळी इको-प्रो संघटनेचे संस्थापक बंडू धोत्रे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे उपस्थित होते. यानंतर त्यांनी इको प्रो द्वारा निर्मित गोंडकालीन किल्ल्याच्या हेरिटेज वॉक येथे हजेरी लावली. यावेळी किल्ल्याचे महत्व आणि इको प्रो संघटनेने केलेले काम याची माहिती जाणून घेतली. यादरम्यान त्यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला. रामाळा तलावाला वाचविण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपूर्वी बैठक झाली होती आणि त्याचा तोडगा काढण्यात आला आहे. रामाळा तलाव वाचविणे आवश्यक आहे. त्याच्याच कामाची पाहणी करण्यासाठी मी येथे आलेलो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील वाढत्या कॅन्सरच्या प्रमाणावर केले भाष्य

चंद्रपूर जिल्हा हा कॅन्सर रुग्णांच्या संख्येत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर येतो. प्रदूषण हा त्यामागील महत्वाचा महत्वाचा घटक मानला जातोय. याबाबतीत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. आमचा अभ्यास यावर सुरू आहे. जोवर काही ठोस कारण समोर येत नाही तोवर एका कुठल्या घटकाला मुख्य घटक म्हणून जबाबदार धरणं उचित नाही. मात्र, तरीही चंद्रपुरात प्रदूषण आहे यात कुठलंही दुमत नाही आणि त्यासंदर्भात आम्ही पाऊले उचलत आहोत असे ते म्हणाले.

अवैध कोळसा डेपोबाबतही केले भाष्य

चंद्रपूर शहरालगत मोठ्या संख्येने कोळसा डेपो आहेत. ज्याला कायदेशीर कुठलीही मान्यता नाही. यामुळे जवळच्या परिसरात मोठे प्रदूषण होत आहे. शिवसेनेने देखील याविरोधात आंदोलन पुकारले होते. तसेच यासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत आपण टप्प्याटप्प्याने पाऊले उचलणार, असे सूचक विधान ठाकरे यांनी यावेळी ( Illegal Coal Depot At Chandrapur ) केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.