चंद्रपूर - चंद्रपूर थर्मल महा औष्णिक विद्युत केंद्रात प्रशिक्षणार्थी भरती करण्यात ( recruitment of trainees at Chandrapur Thermal Power Station ) येत आहे. गैर प्रकल्पग्रस्तांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी समिती ( Inquiry On Commissioner Level ) नेमण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत ( Prajakt Tanpure say to inquiry ) केली.
सुभाष धोटे यांनी कारवाईची केली होती मागणी -
चंद्रपूर येथील विद्युत केंद्रांमध्ये आस्थापना विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर गैर प्रकल्पग्रस्तांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करीत आहेत. यासाठी आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. मूळ जमीन मालकाच्या नावावर वारसदार म्हणून खोटी कागदपत्रे बनवून गैर प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पग्रस्त म्हणून निवड केली जात आहे. या संदर्भात सहाय्यक महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे आणि अन्य कर्मचारी यांचा यात सहभाग असल्याचा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत केला. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
दोषींवर कारवाई करणार - ऊर्जा राज्यमंत्री
१२८ उमेदवारांची प्रशिक्षणार्थी यादी बोर्डावर लावण्यात आली होती. यापैकी १२८ उमेदवारांना त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊन येण्यास सांगितले होते. यापैकी ५८ उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी सादर केली आहेत. मात्र ७० उमेदवारांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर केली नाहीत. यासंदर्भात ७० उमेदवार बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे भरतीसाठी प्रयत्न करीत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उमेदवार आणि त्यांना सहाय्य करणारे अधिकारी यांच्यावर विभागीय स्तरावरून चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात केली.
हेही वाचा - Dog Carrying Baby Hyderabad : हैदराबादमध्ये चक्क अर्भक तोंडात घेऊन फिरताना दिसला कुत्रा