चंद्रपूर - घुग्घुस शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. याची येत्या दोन दिवसात औपचारिकता पूर्ण होणार असून अनेक वर्षांच्या संघर्षाला आता विराम लागणार आहे, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (29 ऑगस्ट) स्पष्ट केले आहे.
घुग्घुस नगरपालिकेच्या संदर्भात भाष्य करताना वडेट्टीवार यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. घुग्घुस नगरपालिकेच्या संदर्भात काहींनी याची घोषणा केली. त्यांचे मोठमोठे फलक लावण्यात आले, हारतुरे टाकून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. मात्र, आज या नगरपालिकेची अधिकृत घोषणा झाली आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता त्यांनी टोला लगावला.
हेही वाचा - गणेशोत्सव; कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; पाच दिवसात ३,१४३ गणेशमूर्तींचे विसर्जन