ETV Bharat / state

Deputy CM Devendra Fadnavis पावसाळी अधिवेशन संपताच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत सुरू होईल

author img

By

Published : Aug 16, 2022, 5:11 PM IST

Updated : Aug 16, 2022, 5:32 PM IST

शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर त्वरित ही मदत देणे सुरु होईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे क्रांती शहीद सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

Deputy CM Devendra Fadnavis
Deputy CM Devendra Fadnavis

चंद्रपूर - हे वर्ष हे पुराचे वर्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र यावेळी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर त्वरित ही मदत देणे सुरु होईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे क्रांती शहीद सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

16 ऑगस्ट 1942 रोजी देशभरातील स्वातंत्र्य आंदोलनात 3 दिवस चिमूर ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला होता. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी शहीद सन्मान सोहळा आयोजित केला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री या कार्यक्रमात उपस्थित होते. चिमूर शहरातील हुतात्मा स्मारक आणि क्रांती स्मारकावर फडणवीस यांनी आदरांजली अर्पण केली. स्थानिक बीपीएड कॉलेज मैदानावर शहीद सन्मान सोहळ्याचे जाहीर आयोजन केले गेले. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर क्रांती शहिदाना नमन केले. राज्यातील ताज्या अतिवृष्टीची झळ पोचलेल्या नागरिकांना एनडीआरएफ निकषांपेक्षा अधिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मागील सरकारने धानाला बोनस दिला नाही मात्र आपले सरकार धानाला बोनस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा - Monsoon Session 2022 विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असून प्रश्नोत्तराचा तास राहणार अनुत्तरीत

Last Updated : Aug 16, 2022, 5:32 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.