चंद्रपूर- दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह वर्धा नदी पात्रात आढळून आला आहे. ही घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आहे. सुनिल भोयर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
राजुरा येथील आमराई वार्डात राहणारे सुनिल बाबुराव भोयर हे १२ डिसेंबरला दुचाकीने घराबाहेर पडले होते. मात्र, ते घरी परतले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, शनिवारी राजुरा-बल्हारपूर मार्गावर असलेल्या पुलाजवळ वर्धा नदी पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची तपासणी केली असता, तो सुनिल भोयर यांचा असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.
हही वाचा- सावकारी कर्जामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या