ETV Bharat / state

मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉ. कुबेर रुग्णालयात तोडफोड - चंद्रपूर बातम्या

शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात तोडफोड झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Apr 1, 2020, 4:33 PM IST

चंद्रपूर - शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात तोडफोड झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली.

राकेश यादव (वय ३६) असे कोळसा खाण कर्मचारी असलेल्या मृताचे नाव आहे. त्याला लिव्हर सोरायसिस हा रोग होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते. मागील पाच वर्षांपासून तो नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. नोव्हेंबर महिन्यापासून त्याने हा उपचार घेणे सोडले होते. यानंतर तब्येत बिघडल्यानंतर त्याला कुबेर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये 29 मार्चला दाखल करण्यात आले होते. त्याचे दारू पिणे सुरूच होते असे नातेवाईकांचे म्हणणे होते.

यानंतर त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला. मात्र, यानंतर त्याच्या शरीराने प्रतिसाद देणे कमी केले. यकृत दारू प्यायल्यामुळे खराब झाले होते, रक्ताच्या गुठळ्या होणेही सुरू झाले होते. अशातच अवयव निकामी होत गेल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, ही बाब रुग्णांच्या नातेवाईकांना माहीत आहे, की नाही हे अजून अस्पष्ट आहे. आज त्याचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णालयात तोडफोड केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.