ETV Bharat / state

कोरोनाच्या महामारीत मरण झाले स्वस्त; स्मशानभूमीत चितांची ज्वाला शमता शमेना - चंद्रपूर कोरोनाबाधित अंत्यसंस्कार बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. चंद्रपूरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा परिस्थितीमुळे स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक चिता जळताना दिसत आहेत.

Chandrapur corona patients last rituals news
चंद्रपूर कोरोनाबाधित अंत्यसंस्कार बातमी
author img

By

Published : Apr 16, 2021, 11:05 AM IST

चंद्रपूर - कोरोनाशी दोन हात करताना जी व्यक्ती अखेरचा श्वास घेते ती कुणाचे वडील, कुणाची आई, भाऊ, बहीण किंवा आणखी कोणी जिवलग असते. मात्र, जेव्हा त्यांना स्मशानभूमीत आणले जाते तेव्हा मात्र, तो निव्वळ एक मृतदेह असतो. कारण, एक-दोन नव्हे तर अनेक मृतदेह एकाच वेळी स्मशानभूमीत आणले जात आहेत. अशा परिस्थिती येथे भावनेला स्थान नसते. आणलेल्या मृतदेहांची त्वरित विल्हेवाट लावायची असते. कारण पुन्हा दुसऱ्या मृतादेहांची खेप येथे आणायची असते. ही स्थिती आहे चंद्रपूर शहरातील स्मशानघाटाची. कोरोनाने माणसांपासून मानवी संवेदनाच हिरावून घेतली आहे. आणि आपण यावर काहीही करू शकत नाहीत. चंद्रपूरच्या स्मशानभूमीत दररोज 15 ते 20 मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. सकाळपासून सुरू झालेल्या चितेच्या ज्वाला शमतच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती किती बिकट झाली आहे, याचे हे द्योतक आहे.

स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक चिता जळताना दिसत आहेत

आरोग्य यंत्रणा कोलमडली, मृत्यू वाढले -

जेव्हा राज्यभरात कोरोनाचे रूग्ण चिंताजनकरित्या वाढत होते. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र, ही संख्या फक्त दोन आकडी होती. मात्र, राजकीय अनास्था आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळीच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. तरीही त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मिळेनासे झाले आहेत. बेड नाही म्हणून रूग्णांना चोवीस तास वाहनात बसवून तर गंभीर रूग्णाला उघड्यावर झोपावे लागत आहे. याचा परिणाम म्हणजे मृत्यूदरात अचानक वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे दररोज दोन ते तीन मृत्यू होत होते. आता हीच संख्या सरासरी 15 ते 16 पर्यंत पोचली आहे.

भंगारमध्ये निघालेल्या शववाहिका घ्याव्या लागल्या सेवेत -

चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत केले जातात. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने एकाच वेळी 20 जणांचा अंत्यविधी उरकता यावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या भंगारमध्ये निघालेल्या शववाहिकेला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी सेवेत घेण्यात आले आहेत. सध्या मनपाचे 20 कर्मचारी मृतदेहांना हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत घेऊन जाणे, त्यांचा अंत्यसंस्कार करणे, या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

नातेवाईकांना परवानगी नाही -

शववाहिकेसाठी काही वेळ ठरवण्यात आला आहे. मृतादेहांची निश्चित संख्या झाल्यावर शववाहिका बोलवली जाते. तत्पूर्वी नातेवाईकांना मृतकांचे अंत्यदर्शन घडवले जाते. कारण स्मशानभूमीत नातेवाईकांना येण्याची परवानगी नाही. एकाच वेळी एका खेपेला शववाहिकेत सात-सात मृतदेह आणले जातात. त्यामुळे स्मशानभूमीत नातेवाईकांना मुभा दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच कोरोनाच्या प्रसाराचा धोकाही वाढतो. केवळ मृताच्या एकाच नातेवाईकाला चिताग्नीजवळ जाण्याची परवानगी आहे. मनपाचे मुकादम हजारे सांगतात की, ते सकाळी स्मशानभूमीत येतात आणि मध्यरात्री घरी जातात. गेल्या काही दिवसांपासून हे नियमीत झाले आहे.

हेही वाचा - हाफकिनला कोवॅक्सीनचे उत्पादन घेण्याकरता केंद्राची मान्यता; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.