ETV Bharat / state

लॉकडाऊन! संचारबंदीतही चंद्रपुरात अनेकांचा 'मुक्त'संचार, काही ठिकाणी पोलिसांचीच अनुपस्थिती

चंद्रपूर शहरातील अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांचा मुक्त संचार होत आहे. संचारबंदीच्या दुसऱ्याच दिवशी हे चित्र पाहायला मिळणे अत्यंत निराशाजनक आहे.

लॉकडाऊन chandrapur
संचारबंदी
author img

By

Published : Mar 26, 2020, 7:40 PM IST

चंद्रपूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र, अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांचा मुक्त संचार होत आहे. संचारबंदीच्या दुसऱ्याच दिवशी हे चित्र पाहायला मिळणे अत्यंत निराशाजनक आहे. त्यामुळे येणारे 19 दिवस कसे असणार, याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

चंद्रपुरात संचारबंदी असताना नागरिकांचा मुक्त संचार...

हेही वाचा... कोरोनाचा फटका : स्वगृही परतण्यासाठी मजुराचा पायी प्रवास, दोन दिवसांनी पोहोचला घरी

कोरोना विषाणूने मानवी जीवनाच्या अस्तित्वाचे आव्हान उभे केले आहे. देशाला यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 तारखेपासून येणाऱ्या 21 दिवसापर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. म्हणजेच सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात संचारबंदी अगोदरच सुरु करण्यात आली होती. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आज (गुरुवार) या बंदोबस्तात शिथीलता आल्याचे पहायला मिळाले.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवरील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे काम नसतानाही अनेक नागरिकांचा शहरात मुक्त संचार होताना आढळून आला. नागरिकांना अडवणूक करणारे कोणीच नसल्यामुळे अनेक ठिकाणी ते घोळका करुन उभे होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी काल (बुधवार) संचारबंदीची अंमलबजावणी यापेक्षाही सक्तीचे करण्याचे निर्देश दिले होते. असे असताना शहरातील प्रत्यक्षात चित्र मात्र निराशाजनक होते.

हेही वाचा... दिलासादायक..! कोरोनाच्या 15 रुग्णांना डिस्चार्ज

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, आझाद बगीचा, गिरणा चौक, गांधी चौक, छोटा बाजार चौक, अशा मुख्य आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसच तैनात नसल्यामुळे अनेक नागरिक आपल्या दुचाकीने शहरात मुक्त संचार करत होते. मुख्य म्हणजे पोलिसांच्या ऐवजी काही ठिकाणी वाहतूक पोलिसांना ठेवण्यात आले. देशात संचारबंदी केल्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आणखी 19 दिवस त्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.