ETV Bharat / state

जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त  - चंद्रपूर कोरोना अपडेट

जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 753 वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 729 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 862 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Oct 3, 2020, 4:49 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 239 नवीन बाधितांची नोंद झाली असून उपचाराअंती सर्वाधिक 539 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात असे पहिल्यांदाच घडले आहे. मध्यंतरी करण्यात आलेली जनता संचार बंदी यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती संथ झाली आहे, बाधित होण्याचा दर मंदावला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 753 वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 729 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 862 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, रामनगर, राजुरा येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू नवरगाव, सिंदेवाही येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तर, पाचवा मृत्यू महात्मा गांधी वार्ड, बल्लारपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 29 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील मृत्यू झालेल्या पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. चवथ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, पाचव्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 162 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 153, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.