ETV Bharat / state

..तर कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांना झोडपून काढेन, नगरसेवक पप्पू देशमुखांचा इशारा - आंदोलन

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी असंघटित कामगारांचा अंत पाहू नये. मागण्या पूर्ण न झाल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून झोडपून काढेन, असा गर्भित इशारा पप्पू देशमुख यांनी आंदोलनात दिला.

आंदोलनकर्ते
author img

By

Published : Feb 7, 2019, 1:19 PM IST

चंद्रपूर - कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवारी जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी असंघटित कामगारांचा अंत पाहू नये. मागण्या पूर्ण न झाल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून झोडपून काढेन, असा गर्भित इशारा पप्पू देशमुख यांनी आंदोलनात दिला.

आंदोलनकर्ते
undefined

कामगार या अन्यायकारक व्यवस्थेला धडा शिकवतील. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, उज्वल कन्स्ट्रक्शन येथे शेकडोंच्या संख्येने असंघटित कामगार काम करतात. मात्र, या कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क नाकारले जातात. या कामगारांना नियमित वेतन मिळत नाही. त्यांचा अनेक महिन्यांपासून पगार थकीत आहे. कामगारांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापन उदासीन आहे. तसेच व्यवस्थापन या कामगारांना अपमानास्पद वागणूक देते. या सर्व मुद्द्यांवर जनविकास सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

नगरसेवक पप्पू देशमुख
undefined

यामध्ये असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौकापासून जटपुरा गेटमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी पोलिसांनी मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केला. पप्पू देशमुख आणि पोलिस यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. देशमुख यांनी आक्रमक होत सुरक्षा कठड्याला न जुमानता कामगारांना घेऊन जिल्हाधिकारी गेटकडे कूच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या मार्गावर या कामगारांनी ठिय्या मांडल्यामुळे या दिशेची वाहतूक काही काळ ठप्प पडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली. १५ दिवसांच्या आत समस्या निकाली न लागल्यास संघटना आक्रमक होईल. ही आरपारची लढाई असून यानंतर कामगार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना झोडपून काढणार, असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Intro:चंद्रपूर : कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी असंघटित कामगारांचा अंत पाहू नये, मागण्या पूर्ण न झाल्यास हे कामगार या अन्यायकारक व्यवस्थेला धडा शिकवेल. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून झोडपून काढेन असा गर्भित इशारा आज पप्पू देशमुख यांनी आंदोलनात दिला.

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ आज जन विकास असंघटित कामगार कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

Body:चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, उज्वल कन्स्ट्रक्शन येथे शेकडोंच्या संख्येने असंघटित कामगार काम करतात. मात्र, या कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क सुद्धा नाकारले जातात. या कामगारांना नियमित वेतन मिळत नाही, त्यांचा अनेक महिन्यांपासून पगार थकीत आहे, कामगारांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापन उदासीन आहे. तसेच व्यवस्थापन या कामगारांना अपमानास्पद वागणूक देते. या सर्व मुद्द्यांवर जन विकास सेनेच्या वतीने आज मोठा मोर्चा काढण्यात आला.

Conclusion:यामध्ये असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौकापासून जटपुरा गेट मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी पोलिसांनी मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केला. पप्पू देशमुख आणि पोलिसांत शाब्दीक चकमकही झाली. देशमुख यांनी आक्रमक होत सुरक्षा कठड्याला न जुमानता कामगारांना घेऊन
जिल्हाधिकारी गेटकडे कूच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या मार्गावर या कामगारांनी ठिय्या मांडल्यामुळे या दिशेची वाहतूक काही काळ ठप्प पडली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली. 15 दिवसांच्या आत समस्या निकाली न लागल्यास संघटना आक्रमक होईल. ही आरपारची लढाई असून यानंतर कामगार आपले कंत्राटदार आणि अधिकारी यांना झोडपून काढणार असा इशारा यावेळी देण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.