ETV Bharat / state

चिमूर येथील हिलिंग टच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द - Corona dedicated hospital

रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईक व सामाजिक संघटनानी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती रुग्णांलयाची मान्यता रद्द केली.

हिलिंग टच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द

author img

By

Published : May 7, 2021, 12:21 PM IST

चिमूर - तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग पाहता चिमूर येथील हिलींग टच मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयास कोविड केअर सेंटर म्हणुन मान्यता देण्यात आली होती. मात्र मान्यता देताना नमुद-केलेल्या अटीशर्ती पुर्ण न करता हे रुग्णालय सुरू करण्यात आले.

याबाबत रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईक व सामाजिक संघटनानी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती रुग्णांलयाची मान्यता रद्द केली.

चिमूर तालुक्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. ज्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. या परिस्थितीवर मात करण्याकरिता चिमूर येथील खासगी रुग्णालय हिलींग टच मल्टी स्पेशालिटीला कोरोना केअर सेंटर म्हणून परवानगी देण्यात आली होती. रुग्णांलयात दहा सुसज्य बेड व दोन व्हेंटिलेटर असलेल्या रूम असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. त्याची पडताळणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.

रुग्णालया विरोधात तक्रारी-

हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाना आवश्यक त्या सेवा व सुविधा तसेच तज्ञ डॉक्टर याचा अभाव असल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून सुरवातीलाच २ लाख रुपये घेतले जात होते. मात्र रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला जात नव्हता, त्यामुळे अनेक रुग्ण दगावले असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.

तसेच रुग्णालयातील असुविधेने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारार्थ आकारलेले शुल्क परत करावे, आणि रुग्णांलयावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मृत रुग्णांचे भाऊ शिवम सोरदे ,शांतिभूषण सोरदे तसेच भारतीय क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष डार्विन कोब्रा व उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर, कैलास भोयर यांनी केली.

जिल्हाधिऱ्यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी -

जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन हिलींग टच या रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सदर रुग्णांलयाची आरोग्य अधिकांऱ्यांनी चौकशी केली असता, रुग्णालयास ज्या अटीशर्ती आधारे मान्यता दिली होती त्या अटीशर्ती पुर्ण नसल्याचे समोर आले. त्या अहवालानुसार कोरोना केअर सेंटरची मान्यता रद्द केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.