चंद्रपूर - शाकाहारी खवय्यांसोबतच मांसाहारी खवय्यांची गोष्टच वेगळी असते. मांसाहारी प्रेमी प्रत्येक वेळी त्यांचे जेवणावरचे प्रेम दाखवून देतात. म्हणून चंद्रपूरातील सासू-सूनेने तब्बल 13 एकर शेती सांभाळत मांसाहारी खवय्यांसाठी वेगळीच मेजवानी दिली आहे. त्यांच्या या ढाब्यातील गावठी कोंबड्य़ाचे चिकन अतिशय लोकप्रिय आहे. त्याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.
गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. अनेक वर्ष शेती सांभाळतांना त्यांनी शेतातच ढाबा सुरू केला. प्राजक्ता भोजनालय असे या धाब्याचे नाव आहे. सुरुवातीला ही सारी जबाबदारी त्यांनी पेलली. मात्र, नंतर काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरूणा सावळे यांच्यावर आला. तेरा एकर शेतीत त्या धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायचे, यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी आणि मग ढाब्यात स्वयंपाक बनविण्यापासूनचे सारेच नियोजन करायचे. तसेच रात्री उशिरापर्यत स्वयंपाकाचे काम केल्यानंतर दुसऱया दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायचे. असा अरूणा साळवे यांचा दिनक्रम असतो.
हेही वाचा - दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले
अरूणा त्यांच्या ढाब्यातील गावठी कोबंड्याच चिकन अतिशय लोकप्रिय आहे. लोक बल्लारपूर आल्लापल्लीपासून चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या ढाब्यात येतात. विशेष म्हणजे मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामुल्य जेवणही देतात. आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्या संवेदना जिवंत आहेत. प्रत्येक दिवसातून असे अनेक प्रंसग येतात. मात्र, आम्ही कधी पैशाचा हिशोब करत नाही. माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्या, भुकेल्यांना विनामुल्य जेवण देत असतो, असे अरूणाताई सांगतात.
गेल्या दहा वर्षांपासून व्यवसायातून सामाजिक दायित्व जोपासण्याचे त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरूणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह प्रचंड चालणाऱया ढाब्याचे व्यवस्थापन करणाऱया अरूणाताईंची ही वाटचाल अनेकांना प्रेरणेची शिदोरी ठरली आहे.
हेही वाचा - रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या विरोधात सासूची पोलिसांत तक्रार
सासुंचीही मदत -
अरूणा यांच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुसऱया सासू शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. मात्र, त्याही आपली नोकरी पार पाडून पुर्णवेळ अरूणा यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरूणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हश्चिंद्र साळवे, दिर विपील घाटे हे सारे कुटुंब पूर्णवेळ त्यांच्या मदतीला असते. धानापूरातील अरूणाताईची ही वाटचाल प्रेरणादायीच आहे.